कर्जमाफीवरून अधिवेशन बंद पाडू : हसन मुश्रीफ यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 01:08 AM2017-12-01T01:08:27+5:302017-12-01T01:11:37+5:30

कोल्हापूर : शेतकरी कर्जमाफीच्या आतापर्यंत जाहीर झालेल्या आकडेवारीत कोल्हापूरसह पश्चिम महाराष्टÑातील ऊसकरी शेतकºयाला लाभ मिळालेला नाही,

Stop the session on debt waiver: Hassan Mushrif's warning | कर्जमाफीवरून अधिवेशन बंद पाडू : हसन मुश्रीफ यांचा इशारा

कर्जमाफीवरून अधिवेशन बंद पाडू : हसन मुश्रीफ यांचा इशारा

Next
ठळक मुद्देप्रतापसिंह चव्हाण यांच्या कामाने जिल्हा बँकेला पुनर्वैभव बँकेला सुस्थितीत आणण्यासाठी त्यांनी अनेकवेळा कठोर निर्णय

कोल्हापूर : शेतकरी कर्जमाफीच्या आतापर्यंत जाहीर झालेल्या आकडेवारीत कोल्हापूरसह पश्चिम महाराष्टÑातील ऊसकरी शेतकºयाला लाभ मिळालेला नाही, यासाठी शासन नियमांत बदल करण्याची गरज आहे. ते न झाल्यास दि. ११ डिसेंबरपासून सुरू होणारे हिवाळी अधिवेशन चालू देणार नाही, असा इशारा कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी येथे पत्रकार परिषदेत दिला.
शाहूपुरीतील जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालयात संचालक मंडळाच्या बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतापसिंह चव्हाण यांच्या निरोप समारंभाचे आयोजन केले होते. या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी संचालक पी. एन. पाटील, निवेदिता माने, भैया माने, सर्जेराव पाटील-पेरिडकर, आर. के. पोवार, उदयानी साळुंखे, अशोक चराटी, राजेंद्र पाटील-यड्रावकर, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर आदी प्रमुख उपस्थित होते.
मुश्रीफ म्हणाले, शेतकरी कर्जमाफीसाठी सरकारने दि. १ एप्रिल ते ३१ मार्चपर्यंत कर्ज भरणारे शेतकरी समाविष्ट केले आहेत; परंतु ऊसकरी शेतकरी हे १ आॅक्टोबर ते ३० सप्टेंबर या कालावधीत कर्ज भरतात. त्यामुळे त्यांंना कर्जमाफीचा लाभ होवू शकत नाही. त्यासाठी सरकारला नियम बदलावे लागतील, अधिवेशन सुरू होईपर्यंत यासाठी वाट पाहू, अन्यथा ११ डिसेंबरपासून सुरू होणारे विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू होऊ देणार नाही.
बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतापसिंह चव्हाण यांनी चांगले काम करून बँकेला पुनर्वैभव प्राप्त करून दिल्याचे गौरवोदगार मुश्रीफ यांनी काढले. बँकेला सुस्थितीत आणण्यासाठी त्यांनी अनेकवेळा कठोर निर्णय घेतले. त्यांच्या या शिस्तबद्ध कार्यप्रणालीमुळे त्यांनी मार्चपर्यंत थांबून बँकेच्या ठेवी ६००० कोटींपर्यंत न्याव्यात, कर्मचाºयांचा बोनस यासह विविध विषय हाती घेऊन बॅँकेच्या वैभवात आणखी भर पाडावी अशी इच्छा होती, परंतु त्यांना सांगली जिल्हा बँकेकडे जाणे क्रमप्राप्त आहे, तरीही त्यांनी या बँकेकडे लक्ष द्यावे.

बँक अडचणीतून बाहेर : प्रतापसिंह चव्हाण
प्रतापसिंह चव्हाण म्हणाले, जिल्हा बँकेसाठी आपल्याला शक्य होते तितके योगदान देऊन ती पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न केले. एप्रिल २०१२ मध्ये बँकेच्या प्रशासकपदाची धुरा हाती घेतल्यानंतर असणारे उणे नेटवर्थ, उणे सी.आर.ए.आर., निधीची चणचण, एनपीएचे प्रमाण, संचित तोटा अशा बाबींवर मात करत सर्व संचालकांसह कर्मचाºयांच्या सहकाºयाने मार्च २०१७ चा ताळेबंद आपण रिझर्व्ह बँकेला अपेक्षित असलेल्या निकषांप्रमाणे काढू शकलो. त्याचबरोबर बँकेस सीआरएआर १०.७ ठेवून जिल्हा बँकेचा रिझर्व्ह बँकेकडून असणारा परवाना अबाधित ठेवू शकलो याबाबत समाधानी आहे.
सीईओपदी शिवाजी वाघ यांच्या नावाचा ठराव
बॅँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतापसिंह चव्हाण हे सांगली जिल्हा बॅँकेत रुजू होणार आहेत. त्यामुळे त्यांच्या जागेवर महाराष्ट्र राज्य सहकारी बॅँकेचे सरव्यवस्थापक शिवाजी ठकराम वाघ यांची नियुक्ती व्हावी, असा ठराव संचालक मंडळाच्या बैठकीत करण्यात आला आहे. त्यानुसार पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडेही तशी मागणी करण्यात येणार असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.

Web Title: Stop the session on debt waiver: Hassan Mushrif's warning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.