'सक्षम'च्या ब्रेल वाचन-लेखन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 05:39 PM2019-01-07T17:39:08+5:302019-01-07T17:41:05+5:30

अंध विद्यार्थ्यांना ब्रेल लिपीचा विसर पडू नये म्हणून सक्षम या संस्थेने  ब्रेल लिपीतील वाचन-लेखन स्पर्धा घेतली.  मोबाईलच्या युगात आता अंधजनही ब्रेल भाषेची कला विसरत चालले आहेत. ही लिपी पूर्णत: लयाला जाण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळेच ही कला जोपासण्याच्या हेतूने सक्षम (समता क्षमताधिष्ठित एवं विकास अनुसंधान) या संस्थेच्या कोल्हापूरातील शाखेमार्फत येथील नूतन मराठी विद्यालयामध्ये ही स्पर्धा घेण्यात आली.

Spontaneous response to 'Enabled' Braille Read-Writing Competition | 'सक्षम'च्या ब्रेल वाचन-लेखन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

कोल्हापूरात सक्षम या संस्थेमार्फत आयोजित करण्यात आलेल्या ब्रेल वाचन आणि लेखन स्पर्धेत विविध शाळेतील अंध स्पर्धक सहभागी झाले होते. यावेळी डॉ. अंजली निगवेकर,डॉ. शुभांगी खारकांडे, डॉ. चेतन खारकांडे, गिरिश करडे, स्वाती करकरे उपस्थित होते.

Next
ठळक मुद्दे'सक्षम'च्या ब्रेल वाचन-लेखन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसादलुई ब्रेल यांचेवर सादर केली कविता

कोल्हापूर :  अंध विद्यार्थ्यांना ब्रेल लिपीचा विसर पडू नये म्हणून सक्षम या संस्थेने  ब्रेल लिपीतील वाचन-लेखन स्पर्धा घेतली.  मोबाईलच्या युगात आता अंधजनही ब्रेल भाषेची कला विसरत चालले आहेत. ही लिपी पूर्णत: लयाला जाण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळेच ही कला जोपासण्याच्या हेतूने सक्षम (समता क्षमताधिष्ठित एवं विकास अनुसंधान) या संस्थेच्या कोल्हापूरातील शाखेमार्फत येथील नूतन मराठी विद्यालयामध्ये ही स्पर्धा घेण्यात आली.

अंध शाळेचे निवृत्त शिक्षक वसंत सुतार, विकास हायस्कूलचे विशेष शिक्षक अजय वणकुद्रे आणि सक्षमचे अध्यक्ष गिरीश करडे यांच्या हस्ते लुई ब्रेल यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

यावेळी गौतम कांबळे या शिक्षकांनी लुई ब्रेल यांचेवर कविता सादर केली. ब्रेल लेखन-वाचन स्पधेर्साठी जेष्ठ साहित्यिक सुधा मूर्ति यांच्या 'गोष्टी माणसांच्या' हे ब्रेल लिपितील पुस्तक निवडण्यात आले. या स्पर्धेसाठी या पुस्तकातील निवडक गोष्टींचे उतारे निवडण्यात आले होते. ही स्पर्धा इयत्ता पाचवी ते आठवी आणि नववी ते बारावी अशा दोन गटात पार पडली.

कोल्हापूरातील विविध शाळांमधील ४२ अंध स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला. शिवाजी विद्यापीठाच्या संगीत विभागाच्या प्रमुख डॉ. अंजली निगवेकर यांनी या स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहिले. सक्षमच्या सारिका करडे, स्वाती करकरे, ज्योती मणियार, प्राजक्ता गवंडी, विनोद ओसवाल यांनी यासाठी परिश्रम घेतले. सक्षमच्या उपाध्यक्षा डॉ शुभांगी खारकांडे यांनी आभार मानले.

 

Web Title: Spontaneous response to 'Enabled' Braille Read-Writing Competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.