शिवाजी विद्यापीठाकडून ‘भिलार’ला ५१७ ग्रंथांची अनोखी भेट, सातारा जिल्हा ग्रंथालय संघाचे अधिवेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 01:25 AM2017-11-30T01:25:23+5:302017-11-30T01:27:25+5:30

कोल्हापूर : देशातील वाचनसंस्कृती वृद्धिंगत होण्यासाठी ‘भिलार’सारखी पुस्तकांची गावे जिल्ह्या-जिल्ह्यांत निर्माण व्हायला हवीत,

 Shivaji University offers unique gift of 517 books to 'Bhilaar', Satara District Library Sangh convention | शिवाजी विद्यापीठाकडून ‘भिलार’ला ५१७ ग्रंथांची अनोखी भेट, सातारा जिल्हा ग्रंथालय संघाचे अधिवेशन

शिवाजी विद्यापीठाकडून ‘भिलार’ला ५१७ ग्रंथांची अनोखी भेट, सातारा जिल्हा ग्रंथालय संघाचे अधिवेशन

Next
ठळक मुद्देकुलगुरू देवानंद शिंदे यांच्या ग्रंथसंग्रहाची पाहणी वाचनसंस्कृती जोपासण्यासह ती वृद्धिंगत करण्यासाठी भिलार येथे राबविलेला पुस्तकांचे गाव हा प्रकल्प स्तुत्य

कोल्हापूर : देशातील वाचनसंस्कृती वृद्धिंगत होण्यासाठी ‘भिलार’सारखी पुस्तकांची गावे जिल्ह्या-जिल्ह्यांत निर्माण व्हायला हवीत, अशी अपेक्षा शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी भिलार (जि. सातारा) येथे व्यक्त केली.

सातारा जिल्हा ग्रंथालय संघाचे ४५ वे अधिवेशन, मातृ-पितृ पुरस्कार वितरण आणि स्वातंत्र्यसैनिक देशभक्त भि. दा. भिलारे गुरुजी यांची ९८वी जयंती अशा संयुक्त कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते. या कार्यक्रमात विद्यापीठातर्फे ‘भिलार’ला ५१७ पुस्तके प्रदान करण्यात आली. कुलगुरू डॉ. शिंदे यांनी काल सकाळपासूनच ‘भिलार’मध्ये फिरून तेथील विविध घरांमधील ग्रंथसंग्रहाची पाहणी केली. प्रकल्प समन्वयक श्री. धर्माधिकाºयांनी त्यांना या प्रकल्पाविषयी माहिती दिली. त्यावर कुलगुरू डॉ. शिंदे यांनी वाचनसंस्कृती जोपासण्यासह ती वृद्धिंगत करण्यासाठी भिलार येथे राबविलेला पुस्तकांचे गाव हा प्रकल्प स्तुत्य व ऐतिहासिक स्वरूपाचा असल्याचे मत व्यक्त केले.

राज्याचे ग्रंथालय संचालक किरण धांडोरे यांनी ‘भिलार’च्यावतीने कुलगुरू डॉ. शिंदे हस्ते ग्रंथभेट स्वीकारली. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. द. ता. भोसले, उद्योजक सारंग पाटील, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष संभाजीराव पाटणे, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. डी. के. गायकवाड, उपकुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, प्राचार्य डॉ. डी. आर. मोरे, आर. एस. पाटील, दिलीप कुरळपकर, बी. एस. सावंत आदी उपस्थित होते.

Web Title:  Shivaji University offers unique gift of 517 books to 'Bhilaar', Satara District Library Sangh convention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.