शिवाजी विद्यापीठाचा ५४ वा दीक्षान्त समारंभ उत्साहात, प्रियांका पाटील, दीक्षा मोरे यांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 05:17 PM2018-03-19T17:17:32+5:302018-03-19T17:17:32+5:30

शिवाजी विद्यापीठाच्या ५४ व्या दीक्षान्त समारंभामध्ये ते बोलत होते. लोककला केंद्रातील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते. ज्येष्ठ अवकाश शास्त्रज्ज्ञ किरणकुमार यांच्या हस्ते शिरोली पुलाची (ता. हातकणंगले) येथील प्रियांका पाटील यांना सन २०१७-१८ मधील विद्यापीठाच्या सर्वसाधारण कौशल्यासाठीचे राष्ट्रपती सुवर्णपदक देऊन सन्मानित करण्यात आले.

Shivaji University honors 54th convocation, Priyanka Patil, Diksha More | शिवाजी विद्यापीठाचा ५४ वा दीक्षान्त समारंभ उत्साहात, प्रियांका पाटील, दीक्षा मोरे यांचा सन्मान

शिवाजी विद्यापीठाचा ५४ वा दीक्षान्त समारंभ उत्साहात, प्रियांका पाटील, दीक्षा मोरे यांचा सन्मान

Next
ठळक मुद्देशिवाजी विद्यापीठाचा ५४ वा दीक्षान्त समारंभ उत्साहातप्रियांका पाटील, दीक्षा मोरे यांचा सन्मान

कोल्हापूर : भारताला महान समृद्ध वारसा लाभलेला आहे. त्याचा आधार घेत ज्ञान-विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या योग्य व जबाबदार वापरातून भारताची ‘विश्वगुरू’ ही जुनी ओळख दृढ करा, असे आवाहन ज्येष्ठ अवकाश शास्त्रज्ज्ञ व ‘इस्रो’चे माजी अध्यक्ष ए. एस. किरणकुमार यांनी सोमवारी येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या ५४ व्या दीक्षान्त समारंभामध्ये ते बोलत होते. लोककला केंद्रातील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते. ज्येष्ठ अवकाश शास्त्रज्ज्ञ किरणकुमार यांच्या हस्ते शिरोली पुलाची (ता. हातकणंगले) येथील प्रियांका पाटील यांना सन २०१७-१८ मधील विद्यापीठाच्या सर्वसाधारण कौशल्यासाठीचे राष्ट्रपती सुवर्णपदक देऊन सन्मानित करण्यात आले.

त्यासह वाई (जि. सातारा) येथील दीक्षा मोरे यांना एम. ए. संस्कृत विषयात सर्वाधिक गुण मिळविल्याबद्दल ‘कुलपती पदक’ देऊन गौरविण्यात आले. उत्साही वातावरणात पार पडलेल्या दीक्षान्त समारंभात ५० हजार ४४४ स्नातकांना पदवी प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.

ज्येष्ठ अवकाश शास्त्रज्ञ किरणकुमार म्हणाले, समाजाच्या विकासात शिक्षणाचा मोठा वाटा आहे. आजच्या गतिमान युगात शिक्षणाची प्रक्रिया निरंतर आहे. या स्थितीत ‘लर्न-अलर्न-रिलर्न’ (शिका-विसरा-पुन्हा शिका) ही प्रक्रिया महत्त्वाची आहे. निसर्ग हा महान शिक्षक आहे. गरूडाकडे पाहून एअरक्राफ्टची,तर शार्कपिनच्या रचनेनुसार जहाजाची निर्मिती झाली. समाजाच्या भल्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर होणे आवश्यक आहे. मात्र, समाजाचे भले करताना तंत्रज्ञानाचे शोषण करणे चुकीचे आहे.

या कार्यक्रमात प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी वार्षिक अहवालाचे वाचन केले. यावेळी डॉ. शिर्के म्हणाले, नवे जग वेगवान, स्पर्धेचे आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना पदवीबरोबरच काही महत्त्वाची जीवनकौशल्ये, तंत्रकौशल्ये आत्मसात करावी लागणार आहेत. या कार्यक्रमाच्या प्रारंभी सकाळी सव्वाअकरा वाजता परीक्षा नियंत्रक महेश काकडे हे दीक्षान्त मिरवणुकीने ज्ञानदंड घेऊन कार्यक्रमस्थळी आले.

कार्यक्रमास ज्येष्ठ विचारवंत प्रा. एन. डी. पाटील, ज्येष्ठ शास्त्रज्ज्ञ डॉ. शिवराम भोजे, डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सचिव प्राचार्य शुभांगी गावडे, विद्यापीठाचे वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, अधिष्ठाता डॉ. पी. एस. पाटील, ए. एम. गुरव, भारती पाटील, पी. डी. राऊत, शैक्षणिक सल्लागार डॉ. डी. आर. मोरे, आदी उपस्थित होते. कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आभार मानले. नंदिनी पाटील, आलोक जत्राटकर, धैर्यशील यादव यांनी सूत्रसंचालन केले.
 

 

Web Title: Shivaji University honors 54th convocation, Priyanka Patil, Diksha More

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.