तीन वर्षापासून पुरस्कार रखडलेले शिवछत्रपती पुरस्कार जाहीर, कोल्हापूरातील तब्बल २३ जणांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 06:02 PM2018-02-12T18:02:29+5:302018-02-12T18:13:21+5:30

राज्य शासनाच्या क्रीडा खात्यातर्फे क्रीडा क्षेत्रातील उतुंग कामगिरी करणाऱ्या खेळाडू, संघटक, प्रशिक्षकांना दरवर्षी शिवछत्रपती पुरस्कार दिला जातो. गेल्या तीन वर्षापासून हे पुरस्कार रखडले होते . यंदा ते जाहीर झाले. यात कोल्हापूरातील तब्बल २३ जणांचा समावेश आहे. 

Shishu Chhatrapati Award for the three year award, announces 23 people in Kolhapur, Bibhichan Patil's life achievement | तीन वर्षापासून पुरस्कार रखडलेले शिवछत्रपती पुरस्कार जाहीर, कोल्हापूरातील तब्बल २३ जणांचा समावेश

तीन वर्षापासून पुरस्कार रखडलेले शिवछत्रपती पुरस्कार जाहीर, कोल्हापूरातील तब्बल २३ जणांचा समावेश

Next
ठळक मुद्देकोल्हापूरच्या २३ जणांना शिवछत्रपती पुरस्कार जाहीरबिभीषण पाटील यांना जीवनगौरवतीन वर्षापासून रखडलेले पुरस्कार

कोल्हापूर : राज्य शासनाच्या क्रीडा खात्यातर्फे क्रीडा क्षेत्रातील उतुंग कामगिरी करणाऱ्या खेळाडू, संघटक, प्रशिक्षकांना दरवर्षी शिवछत्रपती पुरस्कार दिला जातो. गेल्या तीन वर्षापासून हे पुरस्कार रखडले होते. यंदा ते जाहीर झाले. यात कोल्हापूरातील तब्बल २३ जणांचा समावेश आहे. 

पुरस्कार जाहीर झालेल्यांमध्ये  आंतरराष्ट्रीय नेमबाज घडविणारे अजित पाटील यांना क्रीडा मार्गदर्शक , अनेक शरीरसौष्ठव व पॉवरलिफ्टर तयार करणारे बिभीषण पाटील यांना जीवनगौरव व ज्येष्ठ कुस्तीपटू संभाजी वरुटे यांना संघटक कार्यकर्ता पुरस्कार जाहीर झाला आहे.

शिवछत्रपती पुरस्कार जाहीर झालेल्यांमध्ये आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू ऋचा पुजारी, दिव्यांग खेळाडू अनिल पवार, नलीनी डवर, अभिषेक जाधव, शुक्ला बिडकर यांना एकलव्य दिव्यांग पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्काराची घोषणा होताच शिवाजी स्टेडीयम येथील जिल्हा क्रीडा कार्यालयात पेढे-साखर वाटून आनंद व्यक्त करण्यात आला. 

पुरस्कार मिळवलेल्यांमध्ये २०१४-१५ -

नेमबाजी - अजित पाटील (क्रीडा मार्गदर्शक), कुस्ती-  चंद्रकांत चव्हाण (क्रीडा मार्गदर्शक)  वेटलिफ्टिंग - प्रदीप पाटील (क्रीडा मार्गदर्शक) जलतरण-  मंदार दिवसे, शरीसौष्ठव - विजय मोरे , वेटलिफ्टिंग-ओंकार ओतारी , गणेश माळी 

एकलव्य दिव्यांग खेळाडू-अनिल पवार, नलिनी डवर( मैदानी,व्हॉलीबॉल, धनुर्विद्या) यांचा समावेश आहे. तर २०१५-१६ -संघटक, मैदानी स्पर्धा - सचिन पाटील, स्केटींग -विक्रम इंगळे, जलतरण - रोहीत हवालदार, शरीर सौष्ठव - अजिंक्य रेडेकर, कुस्ती - कौतुक डाफळे . तर २०१६-१७ - नेमबाजी - स्वप्निल कुसाळे , बुद्धिबळ -ऋचा पुजारी , स्केटींग - प्रिती इंगळे, कुस्ती - विक्रम कऱ्हाडे, पॉवरलिफ्टिंग- अमित निंंबाळकर, एकलव्य दिव्यांग खेळाडू - जलतरण- अभिषेक जाधव, मैदानी- शुक्ला बिडकर, बिभीषण पाटील (जीवनगौरव) यांचा समावेश आहे. 

Web Title: Shishu Chhatrapati Award for the three year award, announces 23 people in Kolhapur, Bibhichan Patil's life achievement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.