शिवछत्रपती राज्य पुरस्कारांच्या अटींच्या फेरविचाराची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 06:34 PM2018-02-06T18:34:55+5:302018-02-06T18:39:41+5:30

खेळाडूंसाठी फारच अवघड : ५ वर्षात ३ स्पर्धा आणि किमान एक पदकाची अट

Reconsideration sought for the terms of Shiv Chhatrapati State Award | शिवछत्रपती राज्य पुरस्कारांच्या अटींच्या फेरविचाराची गरज

शिवछत्रपती राज्य पुरस्कारांच्या अटींच्या फेरविचाराची गरज

Next
ठळक मुद्देपाच वर्षात तीन राष्ट्रीय स्पर्धांमध्ये किमान एक पदक आवश्यककेवळ वरिष्ठ गटाच्या स्पर्धांचाच होतो विचारनॅशनल गेम्सला नाही राष्ट्रीय स्पर्धेचा मान

ललित झांबरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : राज्य शासनातर्फे क्रीडा प्राविण्यासाठी देण्यात येणाºया खेळाडूंसाठीच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांसाठीच्या नियमातीेल काही अटी व शर्र्थींमुळे राज्यातील बरेचसे गुणी खेळाडू पुरस्कारापासून वंचित रहात आहेत. याचा फटका विशेषत: ग्रामीण भागातील खेळाडूंना बसत असल्याची भावना आहे. ग्रामीण खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी या नियमावलीत काही प्रमाणात शिथिलता आणण्याची आवश्यकता असल्याची क्रीडा मार्गदर्शक व खेळाडूंची मागणी आहे.
त्यांचा मुख्य आक्षेप ‘खेळाडूस पुरस्कार वर्षापासून लगतपूर्व पाच वर्षांमध्ये वरिष्ठ गटाच्या तीन राष्ट्रीय स्पर्धा खेळणे’ या अटीस आहे. स्पर्धात्मक खेळांमध्ये ग्रामीण भागातील खेळाडूंना सलग पाच वर्ष खेळणे आणि त्यात तीन वेळा वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय स्पर्धेत संधी मिळणे अवघडच असल्याची त्यांची भूमिका आहे.
मुळात ग्रामीण भागातील बºयाच खेळाडूंची घरची आर्थिक स्थिती बेताचीच असते. त्यामुळे शिक्षण व रोजगाराच्या शोधात असताना एवढा दीर्घकाळ उच्च स्तरावरच खेळ करणे त्यांना शक्य होत नसते. ही वस्तुस्थिती ध्यानात घेऊन ही पाच वर्ष आणि तीन राष्ट्रीय स्पर्धांची अट शिथिल करण्याची मागणी आहे.
पुरस्काराच्या अटी व शर्र्थींमधील नियम क्र.६ नुसार संबंधीत खेळाडूची पुरस्कार वर्षातील ३० जून रोजी संपणाºया वर्षासह लगतपूर्व पाच वर्षातील आंतरराष्ट्रीय,राष्ट्रीय, वरिष्ठ राज्य अजिंक्यपद स्पर्धेतील कामगिरी पुरस्कारासाठी विचारात घेण्यात येते. या पाच वर्षांपैकी कोणत्याही तीन वर्षात संबंधित खेळाडूने अधिकृत राज्य संघातर्फे संबंधित खेळाच्या अधिकृत राष्ट्रीय फेडरेशनमार्फत आयोजित वरिष्ठ राष्ट्रीययस्तर स्पर्धांमध्ये सहभागी होऊन किमान एका वर्षात पदक संपादीत करणे अनिवार्य असते.
तथापी संबंधित खेळाडू थेट पुरस्काराकरिता पात्र असल्यास अथवा त्याचा जागतिक स्पर्धा, आशियाई क्रीडा स्पर्धा (एशियन गेम्स), राष्ट्रकुल स्पर्धा, एशियन चॅम्पियनशीप (वरिष्ठ गट), कॉमनवेल्थ चॅम्पियनशीप (वरिष्ठ गट), या आंतरराष्ट्रीय स्पर्धांपैकी कोणत्याही एकात सहभाग असेल तर लगतच्या पाच वर्षातील किमान एका वर्षी राष्ट्रीय स्पर्धेत पदक संपादन केले असल्याची अटीतून त्याला सूट मिळते.
याशिवाय नियमावलीतील नियम क्र. ७ नुसार लगतपूर्व पाच वर्षांमध्ये वरिष्ठ गटाच्या तीन राष्ट्रीय स्पर्धा खेळणे आणि किमान एक पदक ही अट पूर्ण होत नसेल तर लगतपूर्व पाच वर्षांमध्ये आयोजित नॅशनल गेम्समध्ये खेळाडूस पदक प्राप्त झालेले असेल तर ते पदक वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेतील पदक आहे असे ग्राह्य धरण्याची तरतूद आहे. असे असले तरी तीन राष्ट्रीय स्पर्धांच्या नियमावर बोट ठेवल्याने बरेच खेळाडू अपात्र ठरत आहेत. भारताचे आॅलिम्पिक मानले जाणाºया नॅशनल गेम्सचे पदक पात्र ठरत असेल तर नॅशनल गेम्समधील सहभाग हासुद्धा वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेतील सहभागाच्या समकक्ष मानला जावा आणि केवळ वरिष्ठ गटाच्याच नाही तर सब ज्युनियर व ज्युनियर गटातील कामगिरीसुद्धा विचारात घेतली जावी अशी मागणी आहे.

http://www.lokmat.com/cricket/what-difference-between-prize-given-me-and-my-team-rahul-dravid-angry-bcci/
जळगावच्या तृप्ती तायडेला फटका :
याचा फटका जळगाव जिल्हा तायक्वोंदो असो.ची खेळाडू तृप्ती तायडे हिला बसला आहे. ती २०१० मध्ये बिलासपूर (छत्तीसगड), आणि २०१२ मध्ये पाटना (बिहार) येथे राष्ट्रीय वरिष्ठ तायक्वोंदो स्पर्धेत महाराष्ट्रसाठी खेळली. यादरम्यान २०११ ला रांची (झारखंड) येथे पार पडलेल्या ३४ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत (नॅशनल गेम्स) मध्ये तिने कांस्यपदकही पटकावले. याचाच अर्थ २०१०, ११ आणि २०१२ अशी सलग तीन वर्षे तिने राष्ट्रीय स्तरावर वरिष्ठ गटात महाराष्ट्रचे प्रतिनिधित्व केले परंतु तीन राष्ट्रीय स्पर्धा नसल्यामुळे तिचा प्रस्ताव फेटाळण्यात आला. नॅशनल गेम्स ती खेळली असली तरी तीन राष्ट्रीय स्पर्धा खेळल्या असण्याची अट पूर्ण होत नसल्याचे कारण तिचा प्रस्ताव फेटाळताना दाखविण्यात आले आहे. बॉक्सिंग, वुशू अशा इतर खेळांमध्येही खेळाडू असेच वंचित रहात असल्याची माहिती आहे.

 

Web Title: Reconsideration sought for the terms of Shiv Chhatrapati State Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.