हॉटेल व्हिक्टर पॅलेसला ठोकले सील

By admin | Published: February 17, 2016 12:03 AM2016-02-17T00:03:37+5:302016-02-17T00:47:58+5:30

महापालिकेची कारवाई : गेल्या तीन वर्षांपासून घरफाळा थकबाकी २५ लाख

Seal to the hotel Victor Palace | हॉटेल व्हिक्टर पॅलेसला ठोकले सील

हॉटेल व्हिक्टर पॅलेसला ठोकले सील

Next

कोल्हापूर : गेल्या तीन वर्षांपासून घरफाळा भरला नाही म्हणून महानगरपालिका घरफाळा विभागाने मंगळवारी जुन्या पुणे-बंगलोर महामार्गावरील हॉटेल व्हिक्टर पॅलेसला सील ठोकले. कारवाईवेळी हॉटेलमधील कर्मचारी पळून गेल्यामुळे मनपा अधिकाऱ्यांना हॉटेल शेजारचे पंच बोलावून त्यांच्या समक्ष ही कारवाई करावी लागली. दहा लाखांच्यावर ज्यांची थकबाकी आहे, अशा मिळकतधारकांवर प्रशासनाने कारवाईचा फास आवळला आहे.
महानगरपालिका घरफाळा विभागाने एक फेबु्रवारीपासून घरफाळा थकबाकी वसुलीची मोहीम व्यापक केली आहे. शहरातील चारही विभागीय कार्यालयांत वसुलीसाठी अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली चार वसुली पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकांकडे त्यांच्या त्यांच्या हद्दीतील थकबाकीदारांची यादी देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी लोटस हॉस्पिटलच्या इमारतील सील ठोकल्यानंतर मंगळवारी दुपारी हॉटेल व्हिक्टर पॅलेसला सील लावावे लागले.
व्ही. एच. अपराध हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या मालकीचे हे हॉटेल असून, भोगवटादार म्हणून विजय विक्रमसिंह अपराध यांची महानगरपालिका दफ्तरी नोंद आहे. सन २०१३ पासून हॉटेल व्यवस्थापनाने घरफाळा भरला नव्हता. त्यामुळे त्यांना नोटीस देण्यात आली होती. नोटीसप्रमाणे १७ डिसेंबर २०१५ ला आयुक्त कार्यालयात झालेल्या सुनावणीवेळी आठ दिवसांची मुदत मागून घेतली होती. नंतर हॉटेल प्रशासाने दहा लाख रुपये भरले; परंतु उर्वरित २५ लाख रुपयांची थकबाकी भरली नाही. पुन्हा नोटीस दिली, त्यावेळी पंधरा दिवसांची मुदत मागून घेतली; परंतु त्यांनी आजअखेर थकबाकी रक्कम भरलेली नाही.
मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास मनपाचे करसंग्राहक व निर्धारक दिवाकर कारंडे, अधीक्षक दीपक टिकेकर हे कर्मचाऱ्यांसह हॉटेलवर पोहोचले. त्यांनी हॉटेल सील करायला आलोय, असे सांगताच काही कर्मचारी तेथून पळून गेले. व्हिक्टर पॅलेस हे कोल्हापुरात एक नामवंत हॉटेल असून त्याला सील ठोकल्यामुळे थकबाकीदारांमध्ये खळबळ उडाली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Seal to the hotel Victor Palace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.