सत्यजित कदम यांच्यावर पाच कोटींचा दावा : राजेश क्षीरसागर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 11:17 AM2019-01-19T11:17:43+5:302019-01-19T11:19:43+5:30

कदमवाडी येथील लेआऊटमध्ये माझ्याकडून ७५ लाखांचा निधी देऊन त्यात भ्रष्टाचार केल्याचा बेछूट आरोप करणाऱ्या नगरसेवक सत्यजित कदम उर्फ नाना यांनी ते सिद्ध करून दाखवावेत, अन्यथा त्यांच्यावर पाच कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याची माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यासाठी लागणारे पाच लाख रुपये भरण्यास आपण तयार असल्याचेही क्षीरसागर यांनी सांगितले

Satyajit Kadam claims five crores: Rajesh Kshirsagar | सत्यजित कदम यांच्यावर पाच कोटींचा दावा : राजेश क्षीरसागर 

सत्यजित कदम यांच्यावर पाच कोटींचा दावा : राजेश क्षीरसागर 

Next
ठळक मुद्देसत्यजित कदम यांच्यावर पाच कोटींचा दावा : राजेश क्षीरसागर भ्रष्टाचार केल्याचा आरोप बेछूट, सिद्ध करून दाखवा

कोल्हापूर : कदमवाडी येथील लेआऊटमध्ये माझ्याकडून ७५ लाखांचा निधी देऊन त्यात भ्रष्टाचार केल्याचा बेछूट आरोप करणाऱ्या नगरसेवक सत्यजित कदम उर्फ नाना यांनी ते सिद्ध करून दाखवावेत, अन्यथा त्यांच्यावर पाच कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याची माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यासाठी लागणारे पाच लाख रुपये भरण्यास आपण तयार असल्याचेही क्षीरसागर यांनी सांगितले.

विधानसभा निवडणुकीतील पराभवाच्या धक्क्यातून ते सावरले नसून, त्यांना मानसोपचार तज्ज्ञांच्या उपचाराची आवश्यकता असल्याची टीका त्यांनी केली. नगरसेवक कदम यांनी केलेल्या आरोपांना आमदार क्षीरसागर यांनी प्रत्युत्तर दिले.

ते म्हणाले, नागरिकांकडून कामांची मागणी झाल्यानंतर जिल्हा नियोजनमध्ये त्या कामाचे इस्टिमेट होते. त्यानंतर शासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ठेकेदाराला बिल दिले जाते. त्यामध्ये आमदाराचा संबंध येत नाही; पण शहानिशा न करता काहीही आरोप करायचे, ही कदम यांची संस्कृती आहे. लक्ष्मीपुरीत व्यापाऱ्यांच्या तक्रारीवरून आम्ही आंदोलने केली. आम्ही लोकांसाठी लढतो, तर नाना जनतेला लुटण्यासाठी लढतात,असा टोला क्षीरसागर यांनी लगावला.

 

Web Title: Satyajit Kadam claims five crores: Rajesh Kshirsagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.