सातारा : पंतग उडवताना इमारतीवरून पडून बालक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 12:07 PM2018-10-19T12:07:58+5:302018-10-19T12:18:44+5:30

लक्ष्मी टेकडी, सदर बझार येथील घरकुल योजनेतून नगरपालिकेच्या वतीने बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवर पतंग उडवताना गुरुवारी सायंकाळी सहा वाजता चौथ्या मजल्यावरून एक बालक गंभीर जखमी झाले आहे.

Satara: The child was injured when leaving the building | सातारा : पंतग उडवताना इमारतीवरून पडून बालक जखमी

सातारा : पंतग उडवताना इमारतीवरून पडून बालक जखमी

Next
ठळक मुद्देपंतग उडवताना इमारतीवरून पडून बालक जखमीखासगी रुग्णालयात उपचार सुरू

सातारा : लक्ष्मी टेकडी, सदर बझार येथील घरकुल योजनेतून नगरपालिकेच्या वतीने बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवर पतंग उडवताना गुरुवारी सायंकाळी सहा वाजता चौथ्या मजल्यावरून एक बालक गंभीर जखमी झाले आहे.

याबाबत माहिती अशी की, सातारा नगरपरिषदेच्या वतीने सदर बझार परिसरात घरकुल योजनेतून नवीन इमारतीचे बांधकाम सुरू आहे. गुरुवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास शिवम विक्रम साठे (वय ९, रा. लक्ष्मीटेकडी, सदर बझार) हा मित्रांसोबत इमारतीवर पतंग उडवत होता.

इमारतीच्या गच्छीवर कठडा नसल्याने पंगत उडवण्याचा नादात तो इमारतीवरून खाली पडला. यात त्याच्या हात व डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होता.

Web Title: Satara: The child was injured when leaving the building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.