भगवा-निळा वादाचा प्रयत्न निंदनीय- समरजितसिंह घाटगे : मुरगूडमध्ये भव्य रॅली; मल्लांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 01:04 AM2018-02-20T01:04:13+5:302018-02-20T01:05:20+5:30

मुरगूड : कोरेगाव भीमामध्ये घडलेली घटना शाहूराजांच्या विचारांची पायमल्ली करणारी होती. त्यामुळेच कागल तालुक्यात सर्व जातिधर्मांचे लोक एकत्र येऊन शिवजयंती साजरी करण्याचा मानस आपण व्यक्त केला.

 Samarjit Singh Ghatge: A gigantic rally in piggery; Hospitality | भगवा-निळा वादाचा प्रयत्न निंदनीय- समरजितसिंह घाटगे : मुरगूडमध्ये भव्य रॅली; मल्लांचा सत्कार

भगवा-निळा वादाचा प्रयत्न निंदनीय- समरजितसिंह घाटगे : मुरगूडमध्ये भव्य रॅली; मल्लांचा सत्कार

Next

मुरगूड : कोरेगाव भीमामध्ये घडलेली घटना शाहूराजांच्या विचारांची पायमल्ली करणारी होती. त्यामुळेच कागल तालुक्यात सर्व जातिधर्मांचे लोक एकत्र येऊन शिवजयंती साजरी करण्याचा मानस आपण व्यक्त केला. याला आलेले भव्य स्वरूप पाहून काहींनी यात खोडा घालण्याचा प्रयत्न केला. आम्ही जशी शिवजयंती साजरी केली, तशी आंबेडकर जयंतीही साजरी करणार आहोत; पण उगाचच भगव्या-निळ्यामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न तालुक्यात सुरू आहे. याचा आपण जाहीर निषेध करतो, असे प्रतिपादन ‘म्हाडा’ पुणेचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी केले.

शिवजयंतीनिमित्त मुरगूड शहरात समरजितसिंह घाटगे यांनी नाका नंबर एकपासून बाजारपेठेतून भव्य
रॅली काढली. एलआयसी कार्यालयासमोरील जयसिंगराव घाटगे व नगरपालिका कार्यालयासमोरील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर हिंदू प्रतिष्ठान यांनी आयोजित केलेल्या समारंभात त्यांच्या हस्ते राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कुस्ती मल्लांचा सत्कार झाला. यावेळी माजी नगराध्यक्ष सुखदेव येरुडकर, माजी उपनगराध्यक्ष पांडुरंग भाट, बिद्रीचे माजी उपाध्यक्ष दत्तामामा खराडे, उपनगराध्यक्ष जयसिंग भोसले उपस्थित होते. स्वागत, प्रास्ताविक आयोजक धोंडिराम परीट यांनी केले.

यावेळी त्यांच्या हस्ते दादासो लवटे, डॉ. राजन नाईक, विक्रम पाटील, स्वाती शिंदे, नंदिनी साळोखे, अंकिता शिंदे, सृष्टी भोसले, युवराज पाटील यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी साताºयाचे भगवानराव शेवडे, जान्हवी खराडे, धैर्यशील पारळे, नेहा आंबले, प्रांजल इंगवले, प्रद्युम्न इंगवले, वेदांत मेळवंकी, साक्षी सापळे, वरद घाटगे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास नगराध्यक्ष राजेखान जमादार, माजी नगराध्यक्षा माया चौगले, रेखा मांगले, दीपक शिंदे, अनंत फर्नांडिस, विलास गुरव, विष्णू मोरबाळे, अनिल अर्जुने, राजू फर्नांडिस, आदी प्रमुख उपस्थित होते.

विक्रमसिंह घाटगेंचा पुतळा बसविणार
सहकारामधील आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणून विक्रमसिंह घाटगे यांची ओळख आहे. त्यांच्या स्मृती कायम राहाव्यात, यासाठी त्यांचा भव्य पुतळा बसविणे गरजेचे आहे. पुतळा बसविणे अवघड नाही, पण त्यांच्या कार्याइतकी नैतिकता आपल्याकडे असायला पाहिजे, म्हणून मी गेल्या दोन वर्षांपासून प्रयत्न करतो आहे. येत्या वर्षभरात आता त्यांचा पुतळा आपण बसविणार असल्याचे समरजितसिंह घाटगे यांनी सांगितले.

Web Title:  Samarjit Singh Ghatge: A gigantic rally in piggery; Hospitality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.