धावपटूंनी दिला आरोग्याचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 12:46 AM2018-02-19T00:46:31+5:302018-02-19T00:46:42+5:30

Runners reported health message | धावपटूंनी दिला आरोग्याचा संदेश

धावपटूंनी दिला आरोग्याचा संदेश

googlenewsNext

पहाटे पाच ते सकाळी दहा यावेळेत पोलीस मैदानावरील वातावरणात वेगळेच चैतन्य निर्माण झाले होते. कुतूहलापोटी अनेकांनी स्वत:ची छायाचित्रे काढून घेतली. कोणी गटा-गटाने तर कोणी सेल्फी पॉर्इंटवर छायाचित्रे काढून घेण्यात व्यस्त होते. स्पर्धेत जिंकलो यापेक्षा सहभागी झालो आणि ती यशस्वी पूर्ण केली याचा आनंद प्रत्येकाच्या चेहºयावर ओसंडून वाहताना दिसला. ‘लोकमत’च्या मॅरेथॉनमध्ये ‘मी धावतो माझ्यासाठी’हे ब्रीदवाक्य घेऊन धावणाºया हजारो धावपटूंनी व इतरांनीही ‘स्वत:च्या आरोग्यासाठी रोज धावा,’ असा आरोग्यदायी संदेश दिला.
सर्किटरन विनर
सर्किट रन (नाशिक, औरंगाबाद, नागपूर, कोल्हापूर) महामॅरेथॉन स्पर्धा पूर्ण करणाºया स्पर्धकांना महाराष्ट्राचा नकाशा असलेले स्मृतिचिन्ह ‘लोकमत महामॅरेथॉन’च्या संयोजिका रुचिरा दर्डा व लोकमत समूहाचे कार्यकारी संचालक करण दर्डा यांच्या हस्ते देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये किरण कोरे (औरंगाबाद), विनायक शानभाग (नाशिक), विनोद वाघमारे (अकोला), सचिन जाधव (बडोदा), ऋषिधर ताडपेवर, विजय काकडे (नाशिक), ओजस कुलकर्णी (नाशिक), विठ्ठल आटोळे (सिंदखेड राजा),
डॉ. सुभाषचंद्र वैद्य (राहुरी), प्रसाद पाटील (ठाणे), समीर सुरवडे (मुंबई), प्रज्वल कोटियन, ज्ञानेश्वर महाजन, शशांक झोपे, अशिष पाटील (जळगाव), सुधाकर पाटील (नंदूरबार), जीवन वनारसे, दिलीप मलिक (नागपूर), चेतन वाघ, पूजा श्रीडोळे, आदींचा समावेश होता.

Web Title: Runners reported health message

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.