धरणक्षेत्रात पावसाचा जोर वाढला

By admin | Published: July 17, 2017 12:15 AM2017-07-17T00:15:53+5:302017-07-17T00:15:53+5:30

धरणक्षेत्रात पावसाचा जोर वाढला

Rainfall increased in the reservoir | धरणक्षेत्रात पावसाचा जोर वाढला

धरणक्षेत्रात पावसाचा जोर वाढला

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जिल्ह्णात दिवसभर उघडीप आणि सायंकाळी दमदार पाऊस कोसळत आहे. रविवारी काही अपवाद वगळता दिवसभर कडकडीत ऊन राहिले. धरणक्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असून, राधानगरीसह सहा धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नद्यांच्या पातळीत वाढ होऊ लागली आहे. पंचगंगेची पातळी २३ फुटांपर्यंत पोहोचली असून, अकरा बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी जिल्ह्णाच्या पश्चिम भागात चांगला पाऊस आहे. गगनबावडा, शाहूवाडी, राधानगरी, आजरा व चदंगड तालुक्यांत दमदार पाऊस सुरू आहे. धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस असून राधानगरी, कासारी धरणक्षेत्रात सलग चौथ्या दिवशी अतिवृष्टी सुरू आहे. त्यामुळे धरणाच्या पाणीपातळीत वाढ होऊ लागली आहे. राधानगरी धरण ६४ टक्के भरले असून, वीजनिर्मितीसाठी प्रतिसेकंद ६०० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने भोगावती नदीचे पाणी पात्राबाहेर फेकले आहे. कासारी धरण ७८ टक्के भरले आहे. त्यातून २५० विसर्ग सुरू आहे. घटप्रभा, जांबरे व कोदे धरण शंभर टक्के भरले असून, त्यातून अनुक्रमे २९८०, ८११, ३४५ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नद्यांना फुग आली आहे. रविवारी सायंकाळपर्यंत पंचगंगेची पातळी २३ फुटांवर स्थिर होती. राजाराम बंधाऱ्यातून प्रतिसेकंद १६ हजार घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रूई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ, हळदी, सरकारी कोगे, कडक कोगे, यवलूज असे अकरा बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
धरणातील पाणीसाठा टीएमसीमध्ये असा, कंसात क्षमता -
राधानगरी -५.३२ (८.३६१), तुळशी - २.११ (३.४७१), वारणा - १८.४७ (३४.३९९), दूधगंगा- ११.९० (२५.३९६), कासारी-२.१६ (२.७७४), क डवी-१.५६ (२.५१६), कुंभी- १.८८ (२.७१५), पाटगाव-२.२४ (३.७१६), चिकोत्रा-०.२५ (१.२५), चित्री -०.७१ (१.८८६).

Web Title: Rainfall increased in the reservoir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.