जुना राजवाडा कमानीवर हिलरायडर्सतर्फे तोरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 12:53 PM2017-10-01T12:53:50+5:302017-10-01T12:56:41+5:30

हिलरायडर्स ग्रुपतर्फे शनिवारी विजयादशमीच्या मुहूर्तावर येथील भवानी मंडपातील जुना राजवाडा कमानीवर तांब्याच्या कलशाचे मंगल तोरण बांधण्यात आले. महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी या तोरणाचे पूजन केले.

 The pylor by the HillRoyers on the old Rajawada artery | जुना राजवाडा कमानीवर हिलरायडर्सतर्फे तोरण

हिलरायडर्स ग्रुपतर्फे विजयादशमीच्या मुहूर्तावर येथील भवानी मंडपातील जुना राजवाडा कमानीवर तांब्याच्या कलशाचे मंगल तोरण बांधण्यात आले. महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी या तोरणाचे पूजन केले.

Next
ठळक मुद्देतांब्याच्या कलशाचे मंगल तोरण हिलरायडर्स ग्रुप या गिर्यारोहण संस्थेमार्फत गेली ३० वर्षे तोरण करवीरनगरीतील खेळाडू, कलाकारांचा सत्कार आर्टिफिशेल क्लायमि्बंग वाँल लवकरच

कोल्हापूर 30 : हिलरायडर्स ग्रुपतर्फे शनिवारी विजयादशमीच्या मुहूर्तावर येथील भवानी मंडपातील जुना राजवाडा कमानीवर तांब्याच्या कलशाचे मंगल तोरण बांधण्यात आले. महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी या तोरणाचे पूजन केले.

ऐतिहासिक वास्तूंचे जतन व्हावे या मूख्य उद्देशाने कोल्हापूरातील हिलरायडर्स ग्रुप या गिर्यारोहण संस्थेमार्फत गेली ३० वर्षे विजयादशमीच्या मुहूर्तावर भवानी मंडपातील कमानीवर कलशाचे तोरण बांधण्यात येते. सकाळी आठ वाजता चंद्रकांतदादांनी या मंगल कलशाचे पूजन केल्यानंतर हिलरायडर्सच्या शिलेदारांनी कमानीवर हे तोरण चढविले.

यावेळी करवीरनगरीतील खेळाडू आणि कलाकारांचा त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विजय देवणे, संजय पवार, सहज सेवा ट्रस्टचे सन्मती मिरजे, बाबा पार्टै, निर्मिती अँडचे अनंत खासबारदार, उदय गायकवाड आदी उपस्थित होते.

आर्टिफिशेल क्लायमि्बंग वाँल लवकरच

हिलरायडर्स ग्रुपप्रणित राजर्षी शाहू महाराज अँडव्हेंचर अकँडमीने या कार्यक्रमात पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना कोल्हापूरात आर्टिफिशेल क्लायमि्बंग वाँल उभारण्याचा प्रस्ताव दिला. दादांनी तत्काळ हा प्रस्ताव स्वीकारून लवकरच ही आर्टिफिशेल क्लायमि्बंग वाँल उभारण्याचा शब्द दिला. यामुळे गेली कित्येक वर्षे चढाईचा सराव करणाऱ्या गिर्यारोहका़ंना दिलासा मिळाला आहे.

 

+

Web Title:  The pylor by the HillRoyers on the old Rajawada artery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.