‘भीक मांगो’ आंदोलनाद्वारे निषेध, जमलेले पैसे जावडेकरांना पाठवणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2018 04:36 PM2018-09-16T16:36:53+5:302018-09-16T16:37:54+5:30

केंद्रीय मंत्री जावडेकर यांनी शाळांबाबत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ ‘एआयवायएफ’ आणि ‘एआयएसएफ’च्या कार्यकर्त्यांनी ‘भीक मांगो’ आंदोलन केले.

protest of Prakash jawadekar by collecting money from 'Bhai Maango' movement | ‘भीक मांगो’ आंदोलनाद्वारे निषेध, जमलेले पैसे जावडेकरांना पाठवणार

‘भीक मांगो’ आंदोलनाद्वारे निषेध, जमलेले पैसे जावडेकरांना पाठवणार

Next
ठळक मुद्देराजीनाम्याची मागणी; ‘एआयवायएफ’च्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी

कोल्हापूर : ‘प्रकाश जावडेकरांचा धिक्कार असो’, ‘भाजप सरकार चले जाव’, असा घोषणा देत ऑल इंडिया यूथ फेडरेशन (एआयवायएफ) आणि ऑल इंडिया स्टुडंटस् फेडरेशनने (एआयएसएफ) रविवारी बिंदू चौकात ‘भीक मांगो’ आंदोलनाद्वारे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांचा निषेध केला.

केंद्रीय मंत्री जावडेकर यांनी शाळांबाबत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ ‘एआयवायएफ’ आणि ‘एआयएसएफ’च्या कार्यकर्त्यांनी ‘भीक मांगो’ आंदोलन केले. त्यांनी मंत्री जावडेकर यांचे छायाचित्र कटोऱ्यात ठेऊन, त्याच्या छायाचित्रावर भिकारी असे लिहून हे आंदोलन केले. यावेळी या कार्यकर्त्यांनी ‘शिक्षण आमच्या हक्काचे’, ‘प्रकाश जावडेकर राजीनामा द्या’, ‘निधी आमच्या हक्काचा’, अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. यावेळी ‘एआयवायएफ’चे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य गिरीश फोंडे म्हणाले, जनता सरकारला विविध कररूपाने पैसे देत त्यातूनच सरकार जनतेला शैक्षणिक, आरोग्यविषयक सुविधा देते. त्यामुळे शिक्षणाच्या सुविधेसाठी शाळांनी निधी मागणीला मंत्री जावडेकर यांनी भीक मागणे म्हणणे चुकीचे आहे. या आंदोलनात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सहसचिव नामदेव गावडे, ‘एआयएसएफ’चे जिल्हा सचिव प्रशांत आंबी, आरती रेडेकर, धीरज कटारे, हरिश कांबळे, दिलदार मुजावर, शिवप्रसाद शेवाळे, अमोल पांढरे, राजवैभव कांबळे, अमोल देवडकर, अमित समुद्रे, आनंद सातपुते, कृष्णा पानसे, योगेश कसबे, शुभम कुंभार, महादेव शिंगे, आदी सहभागी झाले.

जमलेले पैसे जावडेकरांना पाठविणार
केंद्रीय मंत्री जावडेकर यांनी ‘शाळांनी सरकारकडे कटोरा घेऊन भीक मागण्यापेक्षा माजी विद्यार्थ्यांकडून पैसे घ्यावेत.’ अशा स्वरूपातील वक्तव्य केले. त्याच्या निषेधार्थ आणि त्यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी आम्ही ‘भीक मांगो’ आंदोलन आहे. या आंदोलनातून जमलेले पैसे आम्ही मंत्री जावडेकर यांना धनादेशाद्वारे पाठविणार आहोत, असे गिरीश फोंडे यांनी सांगितले.
 

Web Title: protest of Prakash jawadekar by collecting money from 'Bhai Maango' movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.