पुढील लक्ष्य ‘महापौर’पद महादेवराव महाडिक : राजाराम साखर कारखान्यावर भाजपा-ताराराणीच्या नगरसेवकांचा जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 01:32 AM2018-02-13T01:32:46+5:302018-02-13T01:32:54+5:30

कसबा बावडा : कोल्हापुरात आता रामराज्याची सुरुवात झाली असून, येणारा महापौर आपला असेल, असे उद्गार माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी येथे काढले.

 Next target 'Mayor' Mahadevrao Mahadik: BJP-Tararani municipal meeting at Rajaram sugar factory | पुढील लक्ष्य ‘महापौर’पद महादेवराव महाडिक : राजाराम साखर कारखान्यावर भाजपा-ताराराणीच्या नगरसेवकांचा जल्लोष

पुढील लक्ष्य ‘महापौर’पद महादेवराव महाडिक : राजाराम साखर कारखान्यावर भाजपा-ताराराणीच्या नगरसेवकांचा जल्लोष

Next

कसबा बावडा : कोल्हापुरात आता रामराज्याची सुरुवात झाली असून, येणारा महापौर आपला असेल, असे उद्गार माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी येथे काढले. छत्रपती राजाराम साखर कारखान्यावर नूतन स्थायी सभापती आशिष ढवळे तसेच भाजपा व ताराराणी आघाडीचे नगरसेवक, प्रमुख कार्यकर्ते भेटण्यास आल्यानंतर ते बोलत होते. यावेळी महाडिक यांनी ढवळे यांना उचलून आनंद व्यक्त केला. याप्रसंगी आमदार अमल महाडिक उपस्थित होते.

ते म्हणाले, रामराज्यामध्ये कधीही कोणावरही अन्याय, अत्याचार झाला नव्हता. आता सर्वांनी असाच एकोपा ठेवावा व काम करावे. स्थायीनंतर आता पुढील लक्ष्य महापौरपद असून, त्यातही भाजपा-ताराराणीचाच झेंडा फडकविण्यासाठी सर्वांनी आतापासून कामाला लागावे, असेही ते म्हणाले. यावेळी भाजपा-ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांनी कारखान्यावर जल्लोष केला. फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाच्या उधळणीबरोबरच माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या जयघोषाच्या घोषणा देऊन नगरसेवक व कार्यकर्त्यांनी हा परिसर दणाणून सोडला.
यावेळी गटनेते सत्यजित कदम, विजय सूर्यवंशी, शेखर कुसाळे, किरण नकाते, सीमा कदम, रुपाराणी निकम, शशिकांत भालकर, वैभव माने, संतोष गायकवाड, स्वप्निल नाईकनवरे, सुनंदा मोहिते, सविता घोरपडे, गीता गुरव, आदी उपस्थित होते.


ढवळे दुसºयांदा सभापती
महापालिकेच्या आर्थिक नाड्या असलेल्या स्थायी समितीच्या सभापतिपदी एकदा निवड व्हावी, अशी अनेक नगरसेवकांची तीव्र इच्छा असते. अनेकांना प्रयत्न करूनही हे पद मिळत नाही; परंतु आशिष ढवळे यांना आठ वर्षांत दुसºयांदा सभापती होण्याचा मान मिळाला. यापूर्वी सन २०१० मध्ये जनसुराज्य पक्षाच्यावतीने त्यांना प्रथम सभापती होण्याची संधी दिली होती. त्यानंतर सोमवारी ‘भाजपा’कडून संधी मिळाली. ढवळे प्रभाग क्रमांक १६ शिवाजी पार्क येथून निवडून आले आहेत. एक शांत, सुशिक्षित व अभ्यास नगरसेवक म्हणून त्यांची ओळख आहे. सन २०१५ मध्ये झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत राष्टÑवादीचे शहराध्यक्ष राजेश लाटकर यांचा त्यांनी पराभव केला होता. शहरातील पाण्याच्या गळतीमुळे होणारे नुकसान, एलईडी बल्बमुळे होणारी बचत याचे अभ्यासपूर्ण विवेचन करून ढवळे यांनी प्रशासनाचे डोळे उघडले होते.

सुनीता राऊत यांच्याकडून निषेध
शिवाजी पेठेतील माजी महापौर सुनीता राऊत व त्यांचे पती माजी नगरसेवक अजित राऊत यांनी अजिंक्य चव्हाण यांचा निषेध केला आहे. चव्हाण यांची वागणूक लज्जास्पद आहे. मागच्या निवडणुकीत मी त्याग करून त्यांना संधी देत निवडून आणले. आज त्यांनी विरोधी गटास मतदान करून शिवाजी पेठेची बदनामी केली आहे. जनतेचा अपमान केला आहे. त्यांचा आम्ही निषेध करत आहे, असे राऊत यांनी म्हटले आहे.

Web Title:  Next target 'Mayor' Mahadevrao Mahadik: BJP-Tararani municipal meeting at Rajaram sugar factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.