गरजू सहाध्यायींना विद्यार्थ्यांची दिवाळी भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 05:03 PM2017-10-12T17:03:27+5:302017-10-12T17:11:51+5:30

कोल्हापूर येथील शिवाजी मराठा हायस्कूलमध्ये शिकणाºया विद्यार्थ्यांनी गुरुवारी सहा वर्षांची परंपरा जपत आपल्याच शाळेतील दोन गरजू सहाध्यायींना दिवाळीची अनोखी भेट दिली.

Meet the students of Diu for the Diwali | गरजू सहाध्यायींना विद्यार्थ्यांची दिवाळी भेट

कोल्हापूर येथील शिवाजी मराठा हायस्कूलमध्ये शिकणाºया विद्यार्थ्यांनी गुरुवारी सहा वर्षांची परंपरा जपत आपल्याच शाळेतील दोन गरजू सहाध्यायींना दिवाळीची अनोखी भेट दिली.

Next
ठळक मुद्दे फटाक्यांचे पैसे वाचवून केली मदत शिवाजी मराठा हायस्कूलची सहा वर्षांची परंपराजमा केलेल्या रक्कमेतून कपडे खरेदी निवृत्त सहायक शिक्षण उपसंचालक संपतराव गायकवाड, रमेश राणे यांचा हातभार

कोल्हापूर : येथील शिवाजी मराठा हायस्कूलमध्ये शिकणाºया विद्यार्थ्यांनी गुरुवारी सहा वर्षांची परंपरा जपत आपल्याच शाळेतील दोन गरजू सहाध्यायींना दिवाळीची अनोखी भेट दिली. फटाक्याचे पैसे वाचवून जमा केलेल्या पैशातून त्यांनी या चिमुकल्यांना कपडे भेट दिले. त्यांच्या चेहºयावरील अवर्णनीय आनंद शाळेतील साºयांनाच वेगळे काही केल्याचे समाधान मिळाले.

दिवाळी तोंडावर आली असताना बच्चेकंपनीला नवीन ड्रेस, फटाके आणि फराळाचे वेध लागतात. परंतु, शिवाजी मराठा हायस्कूलमधील हे विद्यार्थी फटाके न उडविता शाळेतील गरीब आणि गरजू सहाध्यायी विद्यार्थ्यांंचा शोध घेत त्यांनी जमा केलेल्या रक्कमेतून कपडे खरेदी करुन दिवाळीची भेट देत असतात.

कलाशिक्षक मिलिंद यादव यांनी हा पायंडा पाडला आहे. यामुळे गेली सहा वर्षे या शाळेत हा उपक्रम सुरु आहे. गरीब विद्यार्थ्यांना फटाक्याचे पैसे वाचवून अशाप्रकारे मदत करण्याची शिवाजी मराठा हायस्कूलची परंपरा याही वर्षी विद्यार्थ्यांनी कायम राखली. त्यांनी पैसे जमा करुन आपल्याच गरजू सहाध्यायी विद्यार्थ्यांचा शोध घेत त्यांच्या दिवाळी सणाचा आनंद द्विगुणित करुन एक आदर्श निर्माण केला आहे.

कलाशिक्षक मिलिंद यादव यांच्या या उपक्रमाला मुख्याध्यापक प्रवीण काटकर, शिक्षक सविता प्रभावळे, आरती सुतार, अमर जगताप, आणासो माळी, प्रशांत पवार यांनी साथ दिली.

गायकवाड, राणे यांचाही हातभार

निवृत्त सहायक शिक्षण उपसंचालक संपतराव गायकवाड आणि रमेश राणे या ८२ वर्षाच्या निवृत्त तहसीलदारांनीही आपल्याकडील रक्कम या विद्यार्थ्यांच्या जमापूंजीत जमा करुन गरजू विद्यार्थ्यांना दिवाळीसाठी कपडे घेण्यासाठी हातभार लावला.

औषधोपचारासाठी मदत
विपन्नावस्थेतील रहस्यकथाकार गुरुनाथ नाईक हे गोव्यातील रुग्णालयात उपचार घेत आहेत हे समजल्यानंतर त्यांच्या औषधांसाठी या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या खात्यावर पाच हजार रुपयांची रक्कम जमा केली.


फोटो ओळ : कोल्हापूरातील शिवाजी मराठा हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनी रक्कम जमा करुन शाळेतील दोन गरजू सहकाºयांना गुरुवारी कपडे देउन दिवाळीची भेट दिली.

Web Title: Meet the students of Diu for the Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.