मराठा महासंघातर्फे दहशतवादविरोधी रॅलीतून शहिदांना आदरांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 03:31 PM2019-03-15T15:31:46+5:302019-03-15T15:33:16+5:30

‘सारे जहॉँ से अच्छा... हिंदोस्तॉँ हमारा...,’ ‘पाकिस्तान मुर्दाबाद...’अशा घोषणा देत मराठा महासंघातर्फे दहशतवादीविरोधी एकात्मता रॅली काढून पुलवामा हल्ल्यातील शहिदांना अभिवादन करण्यात आले. महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांच्या वाढदिवसानिमित्त ही रॅली काढण्यात आली.

 Maratha Mahasangh honored martyrs from anti-terrorism rally | मराठा महासंघातर्फे दहशतवादविरोधी रॅलीतून शहिदांना आदरांजली

कोल्हापुरात मराठा महासंघातर्फे कोल्हापूर शहरातून दहशतवादविरोधी एकात्मता रॅली काढण्यात आली. (छाया : आदित्य वेल्हाळ)

Next
ठळक मुद्दे मराठा महासंघातर्फे दहशतवादविरोधी रॅलीतून शहिदांना आदरांजलीवसंतराव मुळीक यांच्या वाढदिवसाचे औचित्य

कोल्हापूर : ‘सारे जहॉँ से अच्छा... हिंदोस्तॉँ हमारा...,’ ‘पाकिस्तान मुर्दाबाद...’अशा घोषणा देत मराठा महासंघातर्फे दहशतवादीविरोधी एकात्मता रॅली काढून पुलवामा हल्ल्यातील शहिदांना अभिवादन करण्यात आले. महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांच्या वाढदिवसानिमित्त ही रॅली काढण्यात आली.

दसरा चौकातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास आमदार सतेज पाटील व महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मल्हार सेनेचे अध्यक्ष बबन रानगे, मुस्लिम बोर्डिंगचे कादर मलबारी यांनी पुलवामा हल्ल्याचा निषेध करून या रॅलीचा उद्देश विशद केला.

यानंतर दहशतवादविरोधी रॅलीला सुरुवात झाली. बिंदू चौक, मिरजकर तिकटीमार्गे ही रॅली मंगळवार पेठेतील मराठा महासंघाचे कार्यालय येथे येऊन तिचा समारोप झाला. या ठिकाणी आजी-माजी सैनिकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

रॅलीत इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, ‘सिटीझन फोरम’चे प्रसाद जाधव, शाहीर दिलीप सावंत, शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष फिरोजखान उस्ताद, डॉ. संदीप पाटील, शिवसेनेचे किशोर घाटगे, मराठा महासंघाचे उत्तम जाधव, शशिकांत पाटील, अवधूत पाटील, चंद्रकांत कांडेकरी, सोमनाथ घोडेराव, उमेश बुधले, भानुदास सूर्यवंशी, महेश मछले, रामचंद्र पोवार, पापाभाई बागवान, सुखदेव बुध्याळकर, भाऊसाहेब काळे, तय्यब मोमीन, आदींसह समाजबांधव सहभागी झाले होते.

 

Web Title:  Maratha Mahasangh honored martyrs from anti-terrorism rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.