मान्यवरही धावले ईर्षेने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 12:48 AM2018-02-19T00:48:45+5:302018-02-19T00:49:22+5:30

Manuel ran enthusiastically | मान्यवरही धावले ईर्षेने

मान्यवरही धावले ईर्षेने

Next


कोल्हापूर : कोल्हापूरच्या क्रीडाविश्वात नवे पर्व सुरू करणाºया ‘राजुरी स्टील’ प्रस्तुत ‘लोकमत महामॅरेथॉन’मध्ये रविवारी विविध क्षेत्रांतील मान्यवर उत्साहाने धावले. यात अनेकजण कुटुंबीयांसमवेत सहभागी झाले. स्पर्धा पूर्ण केल्यानंतर त्यांच्या चेहºयावर एक अनोखे समाधान दिसून आले.
महामॅरेथॉनसाठी पहाटे पाच वाजल्यापासून मान्यवर पोलीस ग्राऊंडवर उपस्थित होते. यातील अनेकांनी दहा आणि पाच किलोमीटरमध्ये धावण्याचा आनंद लुटला. यामध्ये आमदार सतेज पाटील, आमदार चंद्रदीप नरके हे मुलगा देवराज याच्यासह, आमदार डॉ. सुजित मिणचेकर हे पत्नी लेखा, मुलगा पार्थ यांच्यासमवेत सहभागी झाले. कोल्हापूर परिक्षेत्राचे
विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील हे पत्नी रूपाली आणि मुलगा
रणवीर, जिल्हा पोलीस अधीक्षक
संजय मोहिते हे मुलगा इंद्रजित, मुलगी सोनाली आणि नातेवाईक मानसिंग, ऋतुजा, सत्यजित व दिग्विजय मोहिते, कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ असोसिएशनचे
अध्यक्ष विश्वविजय खानविलकर ही मुले वीरविजय आणि सिद्धीविजय यांच्यासमवेत धावले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमनार, जिल्हा विधि व सेवा प्राधिकरणाचे न्यायाधीश उमेशचंद्र मोरे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, करवीरचे प्रांताधिकारी सचिन इथापे, उपजिल्हाधिकारी अरविंद लाटकर, शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, करवीरचे पोलीस उपअधीक्षक सूरज गुरव, जयसिंगपूरचे पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, शाहूवाडीचे पोलीस उपअधीक्षक आर. आर. पाटील, पोलीस निरीक्षक दिनकर मोहिते, सहायक पोलीस निरीक्षक स्वाती गायकवाड, जनसुराज्य युवा प्रदेशाध्यक्ष समित कदम हे धावले. दरम्यान, या स्पर्धेतील २१ आणि १० किलोमीटर गटात दोनशे पोलीस कॉन्स्टेबल सहभागी झाले होते.
सेल्फीचे आकर्षण...
एरवी सार्वजनिक समारंभ आणि कार्यक्रमातून दिसणारे आमदार, खासदार आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी ‘स्पोर्टस लुक’मध्ये दाखल झाल्याने अनेकांना त्याचे अप्रुप वाटत होते. ज्यांच्या जवळही जाता येत नाही असे सर्व मान्यवर ‘लोकमत’च्या व्यासपीठावर एकत्र आले. या सर्वांनीही सर्वांमध्ये मिळून-मिसळून गप्पा मारायला सुरूवात केली. अनेकांनी त्यांच्यासमवेत फोटो काढले. सेल्फीसाठी तर अनेकांभोवती गराडा पडला होता.

Web Title: Manuel ran enthusiastically

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.