महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा ‘अ‍ॅप’वर : विजयसिंह यादव महाविद्यालयातील महेश निलजे यांचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 12:05 AM2017-11-28T00:05:12+5:302017-11-28T00:06:53+5:30

Maharashtra Public University Act 'App: The initiative of Mahesh Nilje of Vijaysinh Yadav College | महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा ‘अ‍ॅप’वर : विजयसिंह यादव महाविद्यालयातील महेश निलजे यांचा उपक्रम

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा ‘अ‍ॅप’वर : विजयसिंह यादव महाविद्यालयातील महेश निलजे यांचा उपक्रम

Next
ठळक मुद्दे विद्यार्थी, शिक्षकांना उपयुक्त काही तरी केले पाहिजे यातून सहा-सात महिन्यांपासून अ‍ॅप करण्याचे काम सुरू केले. त्यास यश

सुहास जाधव ।
पेठवडगाव : मोबाईलवरील विविध अ‍ॅपमुळे वेळेची बचत व्हावी, असा प्रयत्न अ‍ॅप निर्मात्यांचा असतो. अशा प्रयत्नांतून शैक्षणिक अ‍ॅप पेठवडगाव येथील महेश बाबूराव निलजे यांनी तयार केले आहे. यामुळे महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा एका टचवर (एमपीयूए) आला आहे. याची खुद्द दखल उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी घेतली आहे.

कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या विजयसिंह यादव महाविद्यालयात निलजे १९९९ पासून अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. तसेच ते महाराष्ट्र राज्य अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघाचे कोल्हापूर विभागाचे अध्यक्ष आहेत. विद्यापीठ कायद्याचे माहिती शोधण्यासाठी पुस्तक चाळावे लागत होते. त्यामुळे वेळ जात होता किंवा एखाद्या जाणकारास त्याबाबतची माहिती विचारावी लागत असे. महाविद्यालयातील विद्यार्थी, पालक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, प्राचार्य, विद्यापीठातील अधिकारी, आदींना विद्यापीठ कायद्याची माहिती तत्काळ मिळत नव्हती. नेहमी सोबत पुस्तक ठेवणे आवश्यक असत होते. मात्र, आज जेथे तंत्रज्ञानाच्या युगात इंटरनेट हा पर्याय आहे. त्यामुळे काही तरी केले पाहिजे यातून सहा-सात महिन्यांपासून अ‍ॅप करण्याचे काम सुरू केले. त्यास यश आले. कायदा, पोटकलम, आदी माहिती ही अ‍ॅपमध्ये आहे.

या पार्श्वभूमीवर अ‍ॅपचे उद्घाटन मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह येथे करण्यात आले. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे उपसचिव सिद्धार्थ खरात, संचालक डॉ. धनराज माने, आनंद म्हापूसकर, राज्य महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघाचे महासचिव रावसाहेब त्रिभुवन, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मुंबई येथे पेठवडगाव येथील विजयसिंह यादव महाविद्यालयाचे अधीक्षक महेश बाबूराव निलजे यांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २0१६ या अ‍ॅपचे उद्घाटन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते झाले. यावेळी महेश निलजे, सिद्धार्थ खरात, डॉ. धनराज माने, आनंद म्हापूसकर, रावसाहेब त्रिभुवन, आदी उपस्थित होते.

अ‍ॅपचा फायदा
अ‍ॅप हे आॅफलाइनने पाहू शकतो. अ‍ॅपच्या माध्यमातून विद्यार्थी, पालक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, प्राचार्य, विद्यापीठातील अधिकारी, आदींना विद्यापीठ कायद्याची व संदर्भ कलमासह माहिती मिळणार, इंग्रजी व मराठी अशी दोन भाषेत आहे.
 

हे अ‍ॅप तयार करण्यासाठी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू देवानंद शिंदे, संस्थेचे अध्यक्ष गुलाबराव पोळ, सचिव विद्या पोळ, सहसंचालक कार्यालय, यादव महाविद्यालय, आदींचे प्रोत्साहन लाभले.
- महेश निलजे,
अ‍ॅप निर्माता / अधीक्षक

Web Title: Maharashtra Public University Act 'App: The initiative of Mahesh Nilje of Vijaysinh Yadav College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.