'Lokmat' powers to rural development villagers | ग्रामविकासातील शिलेदारांना ‘लोकमत’चे बळ


कोल्हापूर : ग्रामविकासामध्ये भरीव योगदान देणाºया कोल्हापूर जिल्ह्यातील तेरा सरपंचांना बुधवारी शानदार समारंभामध्ये ‘लोकमत सरपंच अवॉर्डस्’ने सन्मानित करण्यात आले. येथील व्ही. टी. पाटील स्मृतिभवनामध्ये तब्बल तीन तास चाललेला हा समारंभ म्हणजे ग्रामविकासावरील एक प्रकारचे विचारमंथनच ठरले.
गावागावांतील विकासकामांची नोंद घेण्यासाठी गावच्या कारभाºयांना ‘बीकेटी टायर्स प्रस्तुत लोकमत सरपंच अवॉर्ड २०१७’ने गौरविण्याचा निर्णय ‘लोकमत’ने घेतला. ‘पतंजली आयुर्वेद’ हे या उपक्रमाचे प्रायोजक, तर ‘महिंद्रा ट्रॅक्टर्स’ हे सहप्रायोजक होते.
काँग्रेसचे नेते व माजी ग्रामविकास राज्यमंत्री, आमदार सतेज पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक, निवड समितीमधील प्रमुख जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष भारत पाटील, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख, ‘लोकमत’चे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, संपादक वसंत भोसले यांच्या उपस्थितीमध्ये या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
पहिल्याच वर्षी पुरस्कारासाठी केलेल्या आवाहनाला कोल्हापूर जिल्ह्यातून मोठा प्रतिसाद मिळाला. सुमारे २५० हून अधिक सरपंचांनी आपले प्रस्ताव सादर केले. प्रारंभी दीपप्रज्वलन करून ‘लोकमत’चे संस्थापक स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. त्यानंतर विशाल पाटील नृत्य अकादमीच्या कलाकारांनी सादर केलेल्या शेतकरी नृत्याला उपस्थितांनी जोरदार दाद दिली.
यावेळी बीकेटी टायर्सचे असिस्टंट मॅनेजर महाराष्ट्र सेल्स जुबेर शेख, एरिया मॅनेजर (टेक्निकल सर्व्हिस अ‍ॅन्ड सपोर्ट) नेत्रानंद अंबाडेकर, महिंद्रा अ‍ॅन्ड महिंद्राचे पुणे एरिया मॅनेजर सत्यव्रत देशपांडे, चॅनेल केअर मॅनेजर आनंद दुलारिया, टेरिटरी मॅनेजर नितीशकुमार गावंदर, लकी आॅटो कोल्हापूरच्या वसुंधरा राजेंद्र बडे, जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव, आजºयाचे माजी सरपंच जनार्दन टोपले, आरेचे माजी सरपंच शिवाजीराव पाटील यांचीही प्रमुख उपस्थिती होती. समीर देशपांडे व प्रिया दंडगे यांनी सूत्रसंचालन केले.
दरम्यान, ‘रात्री झोपताना दिव्याची वात विझवून झोपा. तेलाच्या आशेने उंदीर येऊन ही वात पळवेल आणि माझ्या शेतकºयाच्या गवताच्या गंजीला आग लागू शकेल. तेव्हा ही दक्षता घ्या,’ ही शिकवण देणाºया शिवाजी महाराजांचा इतिहास वाचा; म्हणजे नेतृत्व कसे करायचे हे कळेल, असे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी सांगताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.


Web Title: 'Lokmat' powers to rural development villagers
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.