कुरुंदवाड अग्निशमनला बिनतारी संदेश यंत्रणा--: जिल्ह्यातील पहिली नगरपालिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2019 11:49 PM2019-05-09T23:49:28+5:302019-05-09T23:50:13+5:30

येथील पालिकेच्या अग्निशमन विभागात बिनतारी संदेश यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. अशी यंत्रणा कार्यान्वित सणारी कोल्हापूर महापालिकेनंतर जिल्ह्यातील कुरुंदवाड पालिका पहिलीच आहे. त्यामुळे

Kurundwad Fire Fighting Service: - The first municipality in the district | कुरुंदवाड अग्निशमनला बिनतारी संदेश यंत्रणा--: जिल्ह्यातील पहिली नगरपालिका

कुरुंदवाड अग्निशमनला बिनतारी संदेश यंत्रणा--: जिल्ह्यातील पहिली नगरपालिका

googlenewsNext
ठळक मुद्दे आपत्कालीन परिस्थितीत तातडीने हालचाली शक्य

कुरुंदवाड : येथील पालिकेच्या अग्निशमन विभागात बिनतारी संदेश यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. अशी यंत्रणा कार्यान्वित असणारी कोल्हापूर महापालिकेनंतर जिल्ह्यातील कुरुंदवाड पालिका पहिलीच आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत संकटावर मात करणे या विभागाला सोपे जाणार आहे.

येथील नगरपालिका ‘क’ वर्गाची असली तरी अग्निशमन विभाग मात्र ‘अ’ दर्जाचा आहे. प्रशिक्षित कर्मचारी, अत्याधुनिक अग्निशमन बंब, बुलेट फायर फायटरने अग्निशमन विभाग जिल्ह्यात अग्रेसर आहे. शहराला तीनही बाजूंनी नदीचा वेढा असल्याने प्रत्येकवर्षी महापुराचा धोका असतो. निमशहरी भाग असल्याने गावालगत ऊस शेती यामुळे आगीची समस्या वारंवार घडत असते. शिवाय बोळ रस्त्यामुळे एखादी दुर्घटना घडल्यास बचावकार्य पोहोचण्यास अडचण निर्माण होत असते. यामुळे येथील अग्निशमन विभाग नेहमीच अग्रेसर असतो.
अरुंद रस्त्यामुळे आगीच्या ठिकाणी अग्निशमन गाडी जाण्याची अडचण होत असल्याने गतवर्षी या विभागात बुलेट फायर फायटरचा समावेश करण्यात आला आहे.

एखादी मोठी आग, महापूर, वादळासारखे प्रसंग घडल्यास वेळेत पोहोचण्यासाठी व अग्निशमन कर्मचाऱ्यांना एकमेकांच्या संपर्कात येण्यासाठी मोबाईल फोनचा वापर केला जात होता. मात्र, अनेकवेळा मोबाईलला रेंज नसणे, बॅटरी डाऊन होणे, नंबर शोधणे यामुळे वेळ वाया जात असल्याने नावीन्यपूर्ण व जिल्हा नियोजनातून पाच बिनतारी संदेश (वॉकी टॉकी) यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.

ड्रायव्हर, फोरमन व इतर अग्निशमन कर्मचाऱ्यांकडे ही बिनतारी संदेश यंत्रणा असून एकाचवेळी पाचही कर्मचारी एकमेकांशी त्वरित संपर्क करू शकतात. यामुळे आपत्कालीन परिस्थिती नियंत्रण आणण्यासाठी व संदेश देण्यासाठी बिनतारी संदेश यंत्रणा महत्त्वाची ठरणार आहे.
 


या यंत्रणेमुळे अग्निशमन विभाग अत्याधुनिक बनला आहे. एखाद्या आपत्कालीन परिस्थितीत अधिकारी व कर्मचारी यांच्याशी थेट संवाद साधून संकटावर वेळेवर मात करणे सहज शक्य होणार आहे.
- नितीन संकपाळ, फोरमन अग्निशमन विभाग

कुरुंदवाड येथे वॉकीटॉकीवर संपर्क साधताना अग्नीशमन विभागाचे फोरमन नितीन संकपाळ.

Web Title: Kurundwad Fire Fighting Service: - The first municipality in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.