कोल्हापूर : सव्वीस शिक्षकांना जिल्हा परिषदेचे पुरस्कार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 02:26 PM2018-09-05T14:26:50+5:302018-09-05T14:28:43+5:30

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या २६ शिक्षकांना विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. अध्यक्षा शौमिका महाडिक, शिक्षण सभापती अंबरीश घाटगे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. शिक्षकांचे प्रस्ताव पंचायत समितीकडे मागवून, स्वयंमूल्यमापनाधारे मूल्यांकन करून निवड समितीने तीन गटांमध्ये हे पुरस्कार दिले असल्याचे सांगण्यात आले.

Kolhapur: Zilla Parishad Award for twenty-two teachers | कोल्हापूर : सव्वीस शिक्षकांना जिल्हा परिषदेचे पुरस्कार जाहीर

कोल्हापूर : सव्वीस शिक्षकांना जिल्हा परिषदेचे पुरस्कार जाहीर

googlenewsNext
ठळक मुद्देसव्वीस शिक्षकांना जिल्हा परिषदेचे पुरस्कार जाहीरकरवीरमध्ये चार, तर हातकणंगले, पन्हाळ्यात प्रत्येकी तीन पुरस्कार

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या २६ शिक्षकांना विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. अध्यक्षा शौमिका महाडिक, शिक्षण सभापती अंबरीश घाटगे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. शिक्षकांचे प्रस्ताव पंचायत समितीकडे मागवून, स्वयंमूल्यमापनाधारे मूल्यांकन करून निवड समितीने तीन गटांमध्ये हे पुरस्कार दिले असल्याचे सांगण्यात आले.

डॉ. सर्वपल्ली राधाकृ ष्णन पुरस्कार विजेते खालीलप्रमाणे

रवींद्र दोरूगडे (विद्यामंदिर सुलगाव, ता. आजरा), निवृत्ती वैद्य (विद्यामंदिर भाटिवडे ता. भुदरगड), मोहन सुतार (विद्यामंदिर हाजगोळी (तुडिये), संजय मोळे (विद्यामंदिर तिसंगी, ता. गगनबावडा), पुष्पावती दरेकर (विद्यामंदिर हसूरवाडी, ता. गडहिंग्लज), तुकाराम जाधव (विद्यामंदिर हनिमनाळ, ता. गडहिंग्लज), गजानन कोले (कन्या विद्यामंदिर, चंदूर, ता. हातकणंगले), सरदार पाटील (विद्यामंदिर संभाजीनगर, सावर्डे, ता. हातकणंगले), धनाजी पाटील (विद्यामंदिर कारभारवाडी, ता. करवीर), सलीम जमादार (विद्यामंदिर कणेरीवाडी, ता. करवीर), प्रकाश चौगुले (विद्यामंदिर कुमार चिखली, ता. कागल), संपतराव जाधव (केंद्रशाळा पडळ, ता.पन्हाळा), शिवाजी कुसाळे (विद्यामंदिर आवळी खुर्द, ता. राधानगरी), विश्वास पाटील (केंद्रशाळा फेजिवडे, ता. राधानगरी), वासंती आसवले (विद्यामंदिर हारूगडेवाडी, ता. शाहूवाडी), दत्तात्रय कमते (विद्यामंदिर टाकळीवाडी, ता. शिरोळ), नानासाो वडर (विद्यामंदिर पांगिरे, ता. भुदरगड), सुरेश कोळी (कन्या विद्यामंदिर, हेरवाड, ता. शिरोळ).

विशेष पुरस्कार- शंक र जाधव (विद्यामंदिर घोटवडे, ता. पन्हाळा), सर्जेराव सुतार (केंद्रशाळा सडोली खालसा, ता. करवीर), अलका थोरात (जीवनशिक्षण विद्यामंदिर, साळशी, ता. शाहूवाडी)

- डॉ. जे. पी. नाईक, जिल्हा शिक्षक पुरस्कार
कृष्णा भोसले (विद्यामंदिर कोदे बु., ता. गगनबावडा), तानाजी जगताप (कुमार विद्यामंदिर निगवे दुमाला, ता. करवीर), निवास चौगुले (विद्यामंदिर माजनाळ, ता. पन्हाळा), शशिकांत भोजे (ज्ञानदीप विद्यामंदिर, शिरोली पु., ता. हातकणंगले), सिद्धार्थ कांबळे (मुख्याध्यापक, विद्यामंदिर बामणी, ता. कागल)

पत्रकार परिषदेला समाजकल्याण सभापती विशांत महापुरे, भाजपचे पक्षप्रतोद विजय भोजे, सदस्य विनय पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मलिक, प्रभारी प्राथमिक शिक्षणाधिकारी रविकांत आडसूळ उपस्थित होते.

पुढील वर्षीपासून तंत्रस्नेही शिक्षक पुरस्कार

पुढील वर्षीपासून तंत्रस्नेही शिक्षक पुरस्कार देणार असल्याची घोषणा यावेळी शिक्षण सभापती अंबरीश घाटगे यांनी केली. जिल्ह्यातील अनेक प्राथमिक शिक्षकांनी पीपीटी तयार केले आहेत. व्हिडीओ तयार केले आहेत. नवतंत्रज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अध्यापक करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. अशा शिक्षकांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
 

 

Web Title: Kolhapur: Zilla Parishad Award for twenty-two teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.