कोल्हापूर : भाजपच्या राजवटीत महिला असुरक्षित : संगीता तिवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 02:04 PM2019-01-12T14:04:00+5:302019-01-12T14:06:38+5:30

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉँग्रेसने स्थानिक पातळीवर अधिक लक्ष केंद्रित केले असून, त्याचाच भाग म्हणून बूथ कमिट्यांच्या माध्यमातून सक्षम करणार असल्याची माहिती प्रदेश महिला कॉँग्रेसच्या सरचिटणीस संगीता तिवारी यांनी पत्रकार परिषदेत दिली. सर्वाधिक असुरक्षिततेची भावना देशातील महिलांमध्ये असून, भाजपच्या राजवटीचा कंटाळा आल्याने राज्यासह देशात परिवर्तन होणार हे निश्चित असल्याचेही त्यांनी सांगितले. ​​​​​​​

Kolhapur: Women insecure in BJP's rule: Sangeeta Tiwari | कोल्हापूर : भाजपच्या राजवटीत महिला असुरक्षित : संगीता तिवारी

कोल्हापूर : भाजपच्या राजवटीत महिला असुरक्षित : संगीता तिवारी

Next
ठळक मुद्देबूथ कमिट्यांच्या माध्यमातून कॉँग्रेस सक्षम करणार भाजपच्या राजवटीत महिला असुरक्षित : संगीता तिवारी

कोल्हापूर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉँग्रेसने स्थानिक पातळीवर अधिक लक्ष केंद्रित केले असून, त्याचाच भाग म्हणून बूथ कमिट्यांच्या माध्यमातून सक्षम करणार असल्याची माहिती प्रदेश महिला कॉँग्रेसच्या सरचिटणीस संगीता तिवारी यांनी पत्रकार परिषदेत दिली. सर्वाधिक असुरक्षिततेची भावना देशातील महिलांमध्ये असून, भाजपच्या राजवटीचा कंटाळा आल्याने राज्यासह देशात परिवर्तन होणार हे निश्चित असल्याचेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र प्रदेश महिला कॉँग्रेसच्या वतीने शुक्रवारी कॉँग्रेस कमिटीत बूथ कमिट्यांसह पक्षाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध संकल्पनांचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली. यासाठी संगीता तिवारी, महिला प्रदेश उपाध्यक्षा निगार बारसकर, वंदना सातपुते व जयश्री पाटील यांची समन्वयक म्हणून पक्षाने नेमणूक केली आहे.

तिवारी म्हणाल्या, तीन राज्यांत भाजपचे पाणीपत करत कॉँग्रेसने सत्ता हस्तगत केल्यानंतर कॉँग्रेस कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास कमालीचा दुणावला आहे. हा आत्मविश्वास घेऊन आगामी लोकसभा निवडणुकीला सामोरे जाणार असून, गाव पातळीवर पक्ष बळकटीचे धोरण आहे. बूथ कमिट्यांसह पक्षाच्या वतीने विविध संकल्पना राबविल्या जात आहेत, त्याची अंमलबजावणी कशी करायची याची माहिती कार्यशाळांच्या माध्यमातून दिली.

समाज परिवर्तनाचे सक्षमपणे काम महिलाच करू शकतात. राज्य व केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांचा पाढा पक्षाच्या कार्यकर्त्या घरोघरी जाऊन वाचणार असल्याचे निगार बारसकर यांनी सांगितले. कॉँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश सातपुते, शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, सरलाताई पाटील, महिला जिल्हाध्यक्षा सुप्रिया साळोखे, महिला शहराध्यक्ष संध्या घोटणे, सुलोचना नाईकवडे, एस. के. माळी, रूपाली पाटील, आदी उपस्थित होते.
 

 

Web Title: Kolhapur: Women insecure in BJP's rule: Sangeeta Tiwari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.