कोल्हापूर : गांधी मैदान-शिवाजी पेठ व कदमवाडी येथे मटका घेणाऱ्या दोघा एजंटांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 05:30 PM2018-01-08T17:30:33+5:302018-01-08T17:34:45+5:30

गांधी मैदान-शिवाजी पेठ व कदमवाडी येथे मटका घेणाऱ्या दोघा एजंटांना पोलिसांनी सोमवारी अटक केली. संशयित दस्तगीर नूरमहंमद कुडचे (वय ४६, रा. क्रांतिसिंह नाना पाटील नगर), प्रकाश मारुती गोसावी (३९, रा. महालक्ष्मी नगर, कदमवाडी) अशी त्यांची नावे आहेत.

Kolhapur: Two agents arrested in the Gandhi Maidan-Shivaji Peth and Kadewadi area are arrested | कोल्हापूर : गांधी मैदान-शिवाजी पेठ व कदमवाडी येथे मटका घेणाऱ्या दोघा एजंटांना अटक

कोल्हापूर : गांधी मैदान-शिवाजी पेठ व कदमवाडी येथे मटका घेणाऱ्या दोघा एजंटांना अटक

googlenewsNext
ठळक मुद्दे प्रशांत अमृतकर यांच्या पथकाने केली कारवाई दोन महिन्यांत डझनपेक्षा जास्त एजंटांना केली पोलिसांनी अटक एकाही बुकीमालकाला अटक नाहीबुकीमालकांच्या मुसक्या आवळाव्यात, अशी नागरिकांतून मागणी

कोल्हापूर : गांधी मैदान-शिवाजी पेठ व कदमवाडी येथे मटका घेणाऱ्या दोघा एजंटांना पोलिसांनी सोमवारी अटक केली. संशयित दस्तगीर नूरमहंमद कुडचे (वय ४६, रा. क्रांतिसिंह नाना पाटील नगर), प्रकाश मारुती गोसावी (३९, रा. महालक्ष्मी नगर, कदमवाडी) अशी त्यांची नावे आहेत.
 दस्तगीर कुडचे (आरोपी)

 प्रकाश गोसावी (आरोपी)

त्यांच्याकडून मोबाईल, मटक्याचे साहित्य व रोकड असा सुमारे दहा हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केला. बुकीमालक राजू बन्ने (शिवाजी पेठ), अभिजित यादव (जवाहरनगर) हे फरार आहेत. शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

एकाही बुकीमालकाला अटक नाही

गेल्या दोन महिन्यांत डझनपेक्षा जास्त मटका एजंटांना पोलिसांनी अटक केली. अड्डा बुकीमालक कागदोपत्री फरार दाखविले आहेत. ते उजळ माथ्याने शहरात वावरत असताना पोलीस त्यांना अटक करण्याचे धाडस करीत नाहीत.

एकाही फरार बुकीमालकाला अद्याप अटक केलेली नाही. डॉ. अमृतकर यांनी एजंटांना लक्ष्य न करता बुकीमालकांच्या मुसक्या आवळाव्यात, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
 

 

Web Title: Kolhapur: Two agents arrested in the Gandhi Maidan-Shivaji Peth and Kadewadi area are arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.