कोल्हापूर : तेजस्विनीला सुवर्ण मिळताच मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 11:46 AM2018-04-13T11:46:41+5:302018-04-13T11:46:41+5:30

‘आडवाटेवरचं कोल्हापूर’ या उपक्रमाच्या शुभारंभासाठी दसरा चौकातील शाहू स्मारक भवनमध्ये सकाळी साडे आठ वाजता पालकमंत्री चंद्रकांत पाटील आले होते. पर्यटकांच्या बसेस सुटल्यानंतर ते कार्यकर्त्यांशी चर्चा करत असतानाच त्यांना फोन आला. फोनवरची बातमी ऐकली आणि दादा ओरडलेच, तेजुला गोल्ड.. हे हे... दादांची ती आनंददायी घोषणा ऐकल्यानंतर साहजिकच सर्वांनी टाळ्या वाजवून तिचे अभिनंदन केले आणि तेजस्विनीच्या घरच्यांसोबत आनंद व्यक्त करण्यासाठी मंत्री पाटील तिच्या घरी रवाना झाले......

Kolhapur: Tejaswini gets gold as Union minister Chandrakant Patil commits cheating | कोल्हापूर : तेजस्विनीला सुवर्ण मिळताच मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला जल्लोष

कोल्हापूर : तेजस्विनीला सुवर्ण मिळताच मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला जल्लोष

googlenewsNext
ठळक मुद्देतेजस्विनी सावंत यांच्या कारकीर्दीमध्ये चंद्रकांत पाटील यांचे योगदानतेजस्विनीच्या घरच्यांसोबत आनंद

कोल्हापूर : ‘आडवाटेवरचं कोल्हापूर’ या उपक्रमाच्या शुभारंभासाठी दसरा चौकातील शाहू स्मारक भवनमध्ये सकाळी साडे आठ वाजता पालकमंत्री चंद्रकांत पाटील आले होते. पर्यटकांच्या बसेस सुटल्यानंतर ते कार्यकर्त्यांशी चर्चा करत असतानाच त्यांना फोन आला.

फोनवरची बातमी ऐकली आणि दादा ओरडलेच, तेजुला गोल्ड.. हे हे... दादांची ती आनंददायी घोषणा ऐकल्यानंतर साहजिकच सर्वांनी टाळ्या वाजवून तिचे अभिनंदन केले आणि तेजस्विनीच्या घरच्यांसोबत आनंद व्यक्त करण्यासाठी मंत्री पाटील तिच्या घरी रवाना झाले......

सुरूवातीपासून तेजस्विनी सावंत यांच्या कारकीर्दीमध्ये चंद्रकांत पाटील यांचे योगदान राहिले आहे. तिला विदेशी रायफल देण्यापासून ते प्रत्येक स्पर्धेच्या तयारीसाठी पाटील यांनी तिला नेहमीच सहकार्य केले. तेजस्विनी यांनी एकेक यश मिळवल्याचे पाहून मंत्री पाटील यांनी इतर खेळाडूंनाही अशीच सहकार्याची भूमिका घेतली. त्यामुळेच तेजस्विनीच्या या सुवर्णपदकामुळे पाटील यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही.

Web Title: Kolhapur: Tejaswini gets gold as Union minister Chandrakant Patil commits cheating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.