कोल्हापूर : कदमवाडीत फ्लॅट फोडून एक लाख ४० हजार ऐवज चोरीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 12:26 PM2018-09-13T12:26:18+5:302018-09-13T12:29:36+5:30

बंद घराचा कडी-कोयंडा उचकटून साडेतीन तोळ्याचे सोन्याचे दागिने व चांदीची नाणी, जोडवी, ब्रेसलेट व करदोडा , ५० हजार रुपये असा सुमारे एक लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला.

Kolhapur: Stolen one hundred and forty thousand rupees by breaking the flat in Kadwadi | कोल्हापूर : कदमवाडीत फ्लॅट फोडून एक लाख ४० हजार ऐवज चोरीस

कोल्हापूर : कदमवाडीत फ्लॅट फोडून एक लाख ४० हजार ऐवज चोरीस

Next
ठळक मुद्देकदमवाडीत फ्लॅट फोडून मुद्देमाल चोरुन नेलाएक लाख ४० हजार ऐवज चोरीस

कोल्हापूर : बंद घराचा कडी-कोयंडा उचकटून साडेतीन तोळ्याचे सोन्याचे दागिने व चांदीची नाणी, जोडवी, ब्रेसलेट व करदोडा , ५० हजार रुपये असा सुमारे एक लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला.

ही घटना नऊ सप्टेंबरला कदमवाडी येथे उघडकडीस आली. याबाबत अनुराधा चंद्रकांत भोसले (वय ५० , रा.भाऊसो घाटगे कॉलनी, कोल्हापूर) यांनी शाहूपुरी पोलिसात बुधवारी (दि.१२) दिली.

पोलिसांनी सांगितले की, अनुराधा भोसले या मुलीला भेटण्यासाठी पुणे येथे २७ आॅगस्ट ते नऊ सप्टेंबर २०१८ या कालावधीत गेल्या होत्या. त्या पुण्याहून घरी आले असता त्यांच्या बंद घराचा कडी-कोयंडा उचकटला होता.

त्यांच्या घरातील अडीच तोळ्याचे मंगळसुत्र, पाच ग्रॅमचे वळे, दोन ग्रॅम व एक ग्रॅमचा मुलामा हार, एक ग्रॅमचा मुलामा हार, दोन ग्रॅमचे तोडे, चांदीचे नाणे, जोडवी असा ऐवज आणि ५० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने चोरुन नेला.
 

 

Web Title: Kolhapur: Stolen one hundred and forty thousand rupees by breaking the flat in Kadwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.