कोल्हापूर : कठुआ, उन्नाव येथील अत्याचाऱ्याच्या ‘भारिप’तर्फे निषेध,  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 05:25 PM2018-04-20T17:25:10+5:302018-04-20T17:25:10+5:30

कठुआ, उन्नाव व सुरत येथे मुलींवर झालेल्या अत्याचाराचा भारिप बहुजन महासंघातर्फे शुक्रवारी निषेध करुन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. ‘बेटी बचाओ...बेटी पढाओ...’अशा घोषणा करणाºया भाजप सरकारच्या काळातच मुली व महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढल्याची टीका यावेळी करण्यात आली.

Kolhapur: Protests by 'Bharip' of Kadua, Unnao's atrocities, demonstrations before District Collectorate | कोल्हापूर : कठुआ, उन्नाव येथील अत्याचाऱ्याच्या ‘भारिप’तर्फे निषेध,  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

कोल्हापूरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी कठुआ, उन्नाव व सुरत येथे मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ भारिप बहुजन महासंघातर्फे तीव्र निदर्शने करण्यात आली. (छाया : दीपक जाध)

Next
ठळक मुद्दे कठुआ, उन्नाव येथील अत्याचाऱ्याच्या ‘भारिप’तर्फे निषेधकोल्हापूर  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

कोल्हापूर : कठुआ, उन्नाव व सुरत येथे मुलींवर झालेल्या अत्याचाराचा भारिप बहुजन महासंघातर्फे शुक्रवारी निषेध करुन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. ‘बेटी बचाओ...बेटी पढाओ...’अशा घोषणा करणाºया भाजप सरकारच्या काळातच मुली व महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढल्याची टीका यावेळी करण्यात आली.

दुपारी बाराच्या सुमारास ‘भारिप’चे कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकवटले. यानंतर सरकारविरोधात घोषणाबाजी करत तीव्र निदर्शने करण्यात आली. मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना सादर करण्यात आले.

निवेदनातील मागण्या अशा, कठुआ, उन्नाव प्रकरणांची लवकर सुनावणी करण्यासाठी विशेष जलदगती न्यायालयाची स्थापना करुन आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी.

या प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यास विरोध करुन आरोपींच्या समर्थनार्थ आंदोलन करणारे जम्मू काश्मिर सरकारमधील भाजपचे मंत्री लालसिंग चौधरी व चंद्रप्रकाश गंगा यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, या मागण्यांची दखल घेऊन आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा व्हावी, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल.

आंदोलनात शहराध्यक्ष संजय गुदगे, मल्लिाकार्जुन पाटील, राजन पिडाळकर, विमल पोखर्णीकर, मारुती मानकर, संभाजी लोखंडे, किशोर सोनटक्के, संभाजी लोखंडे आदी सहभागी झाले होते.
 

 

Web Title: Kolhapur: Protests by 'Bharip' of Kadua, Unnao's atrocities, demonstrations before District Collectorate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.