कोल्हापूर : ‘भूविकास’चे कर्मचारी करणार निषेध आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 04:54 PM2018-05-11T16:54:22+5:302018-05-11T16:54:22+5:30

भूविकास बॅँक कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत १० मे रोजी मंत्रालयात बैठक बोलावण्याचे आश्वासन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पाळलेले नाही. त्या निषेधार्थ सोमवारी (दि. १४) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याची माहिती कर्मचारी संघटनेचे श्रीकांत कदम यांनी पत्रकातून दिली.

Kolhapur: Prohibition of agitation by the workers of 'Bhuvikas' | कोल्हापूर : ‘भूविकास’चे कर्मचारी करणार निषेध आंदोलन

कोल्हापूर : ‘भूविकास’चे कर्मचारी करणार निषेध आंदोलन

googlenewsNext
ठळक मुद्दे‘भूविकास’चे कर्मचारी करणार निषेध आंदोलनसोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार

कोल्हापूर : भूविकास बॅँक कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत १० मे रोजी मंत्रालयात बैठक बोलावण्याचे आश्वासन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पाळलेले नाही. त्या निषेधार्थ सोमवारी (दि. १४) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याची माहिती कर्मचारी संघटनेचे श्रीकांत कदम यांनी दिली.

‘भूविकास’बॅँकेच्या कर्मचाऱ्यांचा प्रश्न गेली अनेक वर्षे प्रलंबित आहेत. शासनाने आदेश देऊनही मालमत्ता विक्री करून कर्मचाऱ्यांची देणी भागविलेली नाहीत. त्याविरोधात १ मे रोजी काळे झेंडे दाखविण्याचा इशारा कर्मचारी संघटनेने दिला होता.

त्यावेळी पालकमंत्री पाटील यांनी १० मे रोजी मंत्रालयात बैठक घेऊन प्रश्न निकालात काढण्याचे आश्वासन संघटनेला दिले होते; पण त्याबाबत काहीच हालचाल दिसत नसल्याने कर्मचाऱ्यांची दिशाभूल केली आहे. याचा निषेध करण्यासाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सहकुटुंब निषेध आंदोलन करणार असल्याचे कदम यांनी पत्रकात म्हटले आहे.

 

Web Title: Kolhapur: Prohibition of agitation by the workers of 'Bhuvikas'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.