कोल्हापूर :सादळे-मादळे येथील जुगार अड्डयावर छापा : तेरा जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 03:42 PM2018-10-19T15:42:39+5:302018-10-19T15:45:05+5:30

सादळे -मादळे (ता. करवीर) येथील सिल्व्हर व्हॅली या लॉजिंगवर पोलीसांनी गुरुवारी (दि. १८) छापा टाकून तिन पानी जुगार खेळणाऱ्या तेरा जणांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून सव्वा लाख रुपये व ११ मोबाईल असा सुमारे दोन लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. मूख सूत्रधार खासगी सावकार सूरज हणमंत साखरे (वय ३०, रा. देवकर पाणंद, कोल्हापूर) आणि जयदीप अतिग्रे पसार झाले.

Kolhapur: Print to gambling in Sadele-Madale: Thirteen people arrested | कोल्हापूर :सादळे-मादळे येथील जुगार अड्डयावर छापा : तेरा जणांना अटक

कोल्हापूरातील सादळे-मादळे येथील लॉजिंगवर गुरुवारी छापा टाकून जुगार खेळणाऱ्या संशयितांना स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेच्या पोलीसांनी अटक केली.

Next
ठळक मुद्देसादळे-मादळे येथील जुगार अड्डयावर छापा : तेरा जणांना अटकदोन लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त

कोल्हापूर : सादळे -मादळे (ता. करवीर) येथील सिल्व्हर व्हॅली या लॉजिंगवर पोलीसांनी गुरुवारी (दि. १८) छापा टाकून तिन पानी जुगार खेळणाऱ्या तेरा जणांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून सव्वा लाख रुपये व ११ मोबाईल असा सुमारे दोन लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. मूख सूत्रधार खासगी सावकार सूरज हणमंत साखरे (वय ३०, रा. देवकर पाणंद, कोल्हापूर) आणि जयदीप अतिग्रे पसार झाले.

या जुगार अड्डयाची सर्वस्वी व्यवस्था साखरे व अतिग्रे यांनी केल्याचे निष्पन्न झाले आहे. यापूर्वी पोलीसांनी साखरे यांच्या पीरवाडी (ता. करवीर) येथील माळरानावरील साई कला-क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या बंद खोलीमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून साखरेसह १९ जणांना अटक केली होती.


पोलीसांनी संशयितांच्या ताब्यातून जप्त केलेला मुद्देमाल.

सादळे-मादळे येथील सिल्व्हर व्हॅली लॉजिंगवर पत्त्याचा जुगार चालू असलेली माहिती स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांना मिळाली. त्यांनी पथकाला कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार गुरुवारी दूपारी छापा टाकला असता तेराजण जुगार खेळताना मिळून आले. छाप्याची चाहुल लागताच साखरे व अतिग्रे पसार झाले.

संशयित विनोद भिमराव डकरे (वय ४२, रा. जाधववाडी, ता. करवीर), अमोल अजित कुदळे (३६, रा. दुधगांव, ता. मिरज, जि. सांगली), प्रकाश बाबुराव पाटील (४०, रा. राजोपाध्येनगर, कोल्हापूर), ऋषीकेश रणजीत पोवार (३१, रा. राधानगरी), प्रकाश धोंडू पाटील (३१, रा. गारुडी, ता. गगनबावडा), रणजीत बाबुराव पाटील (३१, रा. किरुळे, ता. गगनबावडा), तानाजी श्रीपती जाधव (३०, रा. कळे, ता. पन्हाळा), समाधान धोंडीराम गुरव (३०, रा. पाटपन्हाळा), रविंद्र शामराव पाटील (२७, रा. काळजवडे, ता. पन्हाळा), तानाजी राम विटेकर (३२, रा. आकुर्डे, ता. पन्हाळा), महेश रावसाहेब चौगुले (४३, रा. न्यू मोरे कॉलनी, संभाजीनगर), सागर सुभाष पाटील (३२, रा. मंगळवार पेठ), परशुराम शामराव कांबळे (३२, रा. गारीवडे, ता. गगनबावडा) यांना अटक केली.


 

 

 

Web Title: Kolhapur: Print to gambling in Sadele-Madale: Thirteen people arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.