कोल्हापूर :  डांबून ठेवून मैत्रिणीशी असभ्य वर्तन, साईराज जाधवसह चौघांना पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 12:37 PM2018-08-13T12:37:24+5:302018-08-13T12:44:50+5:30

राजारामपुरीतील मैत्रिणीच्या खोलीत घुसून तिच्याशी असभ्य वर्तन केल्याप्रकरणी ‘एसटी’ गँगच्या सराईत गुंड साईराज जाधव याच्यासह चौघांना राजारामपुरी पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता, १४ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

Kolhapur: Police detained four men, including Sagar Raj Jadhav, for their indecent behavior | कोल्हापूर :  डांबून ठेवून मैत्रिणीशी असभ्य वर्तन, साईराज जाधवसह चौघांना पोलीस कोठडी

कोल्हापूर :  डांबून ठेवून मैत्रिणीशी असभ्य वर्तन, साईराज जाधवसह चौघांना पोलीस कोठडी

Next
ठळक मुद्देडांबून ठेवून मैत्रिणीशी असभ्य वर्तनसाईराज जाधवसह चौघांना पोलीस कोठडी

कोल्हापूर : राजारामपुरीतील मैत्रिणीच्या खोलीत घुसून तिच्याशी असभ्य वर्तन केल्याप्रकरणी ‘एसटी’ गँगच्या सराईत गुंड साईराज जाधव याच्यासह चौघांना राजारामपुरी पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता, १४ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

संशयित साईराज दीपक जाधव (वय २९, रा. राजारामपुरी ११ वी गल्ली), मयूर मल्लिकार्जुन पाटील (२८, रा. मोरेवाडी, ता. करवीर), पंकज रमेश पोवार (२६, रा. माउली पुतळा, राजारामपुरी परिसर), अजिंक्य प्रशांत मगर (२६, रा. राजारामपुरी सहावी गल्ली) अशी त्यांची नावे आहेत. संशयित अभिजित सावंत याच्यासह आणखी दोन साथीदार फरार आहेत. त्यांचा पोलीस शोध घेत आहेत.

अधिक माहिती अशी, शुक्रवारी गटारी अमावस्येच्या रात्री साईराज जाधव व त्याच्या साथीदारांनी पार्टी केली होती. त्या पार्टीस त्यांनी आपल्या मैत्रिणींना निमंत्रित केले होते. पार्टी झाल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास साईराज व त्याचे साथीदार पीडित मैत्रीण राहत असलेल्या खोलीमध्ये घुसले. मैत्रीणही नशेत होती. त्याचा गैरफायदा घेत त्यांनी तिच्याशी असभ्य वर्तन केले.

मारहाण करून तिच्याजवळचे साडेचार हजार रुपये काढून घेतले. आपल्याच मित्रांनी आपल्याशी जबरदस्तीने गैरवर्तन केल्याने तिने त्यांच्याशी वाद घातला. पोलिसांत तक्रार देण्याची धमकी देताच तिला रात्रभर तिच्याच खोलीत डांबून ठेवले. त्यानंतर सकाळी तिची सुटका झाली. याप्रकरणी पीडित युवतीने राजारामपुरीत पोलिसांत सात जणांच्या विरोधात तक्रार दिली.

पीडित युवतीचा ग्रुप आहे. ती राजारामपुरी परिसरात भाड्याने खोली घेऊन राहते. तिला दारू, गांजाचे व्यसन आहे. या सराईत गुन्हेगारांशी तिचे उठणे-बसणे असायचे. त्यातूनच हा प्रकार घडला असून संशयित एसटी गँगचे प्रमुख सदस्य आहेत.

साईराज जाधव याच्यावर यापूर्वी मोका कारवाई केली; परंतु न्यायालयात अपील करून तो बाहेर पडला होता. त्याचे उपद्व्याप वाढत आहेत. त्याच्यावर पुन्हा मोका कारवाई करण्यासाठी प्रस्ताव पाठविणार असल्याचे राजारामपुरी पोलिसांनी सांगितले.
 

 

Web Title: Kolhapur: Police detained four men, including Sagar Raj Jadhav, for their indecent behavior

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.