कोल्हापूर : औषधी वनस्पतींच्या लागवडीतून शेतकऱ्यांना आर्थिक विकासाची संधी : बर्वे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 11:52 AM2018-12-24T11:52:12+5:302018-12-24T11:54:52+5:30

भारतातील शेतकऱ्यांना औषधी व सुगंधी वनस्पतींची लागवड करण्याची मोठी संधी उपलब्ध आहे. त्याद्वारे त्यांनी आर्थिक विकास साधण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मुलुंड (मुंबई) येथील सायंटिफिक रिसर्च सेंटरचे उपसंचालक डॉ. एस. एस. बर्वे यांनी येथे केले.

Kolhapur: Opportunity for economic development of farmers by the cultivation of medicinal plants: Barve | कोल्हापूर : औषधी वनस्पतींच्या लागवडीतून शेतकऱ्यांना आर्थिक विकासाची संधी : बर्वे

 शिवाजी विद्यापीठातील शेतकरी प्रशिक्षणादरम्यान औषधी व सुगंधी वनस्पतींच्या प्रदर्शनाची पाहणी डॉ. एस. एस. बर्वे यांनी केली. यावेळी शेजारी डॉ. अकल्पिता अरविंदेकर, डी. के. गायकवाड, मानसिंगराज निंबाळकर, आदी उपस्थित होते.

ठळक मुद्देऔषधी वनस्पतींच्या लागवडीतून शेतकऱ्यांना आर्थिक विकासाची संधी शिवाजी विद्यापीठातील प्रशिक्षण शिबिर एस. एस. बर्वे

कोल्हापूर : भारतातील शेतकऱ्यांना औषधी व सुगंधी वनस्पतींची लागवड करण्याची मोठी संधी उपलब्ध आहे. त्याद्वारे त्यांनी आर्थिक विकास साधण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मुलुंड (मुंबई) येथील सायंटिफिक रिसर्च सेंटरचे उपसंचालक डॉ. एस. एस. बर्वे यांनी येथे केले.

शिवाजी विद्यापीठाचा वनस्पतिशास्त्र अधिविभाग, महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक यांच्यातर्फे ‘औषधी व सुगंधी वनस्पती संवर्धन व प्रक्रिया’ या विषयावरील जिल्हांतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते. विद्यापीठाच्या नीलांबरी सभागृहातील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, तर विभागीय कृषी सहसंचालक डी. डी. तांबाळे प्रमुख उपस्थित होते.

डॉ. बर्वे म्हणाले, औषधी व सुगंधी वनस्पतींच्या क्षेत्रात शेतकऱ्यांना प्रचंड मोठ्या संधी आहेत. जगभरातील औषधे, सुगंधी द्रव्ये आणि सौंदर्यप्रसाधने निर्माण करणाऱ्या उद्योगांना त्यांची मोठ्या प्रमाणात गरज भासत असते. नैसर्गिक साधनसंपत्तीने भारत अतिशय समृद्ध आहे; तथापि, जागतिक स्तरावर या क्षेत्रातील भारताचा वाटा हा अवघा एक टक्का इतका अत्यल्प आहे. तो आणखी किमान दोन टक्क्यांनी तर आपण सहजरीत्या वाढवू शकतो.

केवळ पश्चिम घाटावर लक्ष केंद्रित केले तरी बराच पल्ला गाठता येऊ शकतो. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रातील विशेषत: पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना औषधी व सुगंधी वनस्पती लागवडीची मोठी संधी आहे. केवळ जिरॅनियमच्या लागवडीमधूनही एकरी एक लाख रुपयांपर्यंतचा फायदा शेतकऱ्यांना होऊ शकतो, इतकी त्याची मागणी आहे. या कार्यक्रमास वनस्पतिशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ. डी. के. गायकवाड, अकल्पिता अरविंदेकर, मानसिंगराज निंबाळकर, आदी उपस्थित होते.

विविध उपक्रम हाती

प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के म्हणाले, शिवाजी विद्यापीठाने आपल्या संशोधनाचा लाभ व्यापक समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी सातत्याने प्रयत्न चालविले आहेत. प्रयोगशाळेकडून शेतीकडे या धोरणाच्या अंगिकारातून विद्यापीठाने शेतकरी वर्गाला जोडण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत.


 

 

Web Title: Kolhapur: Opportunity for economic development of farmers by the cultivation of medicinal plants: Barve

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.