कोल्हापूर : नवीन वीज मीटर मुबलक उपलब्ध, ‘महावितरण’ची माहिती : एजंटांना थारा नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 11:44 AM2018-05-22T11:44:24+5:302018-05-22T11:44:24+5:30

पश्चिम महाराष्ट्रात नवीन वीजजोडण्या व नादुरुस्त वीजमीटर बदलण्यासाठी महावितरणच्या कार्यालयांमध्ये सद्य:स्थितीत सिंगल व थ्री फेजचे एक लाख १४ हजार ९८६ नवीन वीजमीटर उपलब्ध आहेत. नवीन वीजजोडणीच्या प्रक्रियेत स्वयंघोषित एजंटांनाही थारा देऊ नये, असे आवाहन ‘महावितरण’ने केले आहे.

Kolhapur: New electricity meter available, information about 'Mahavitaran': Agents do not have a station | कोल्हापूर : नवीन वीज मीटर मुबलक उपलब्ध, ‘महावितरण’ची माहिती : एजंटांना थारा नको

कोल्हापूर : नवीन वीज मीटर मुबलक उपलब्ध, ‘महावितरण’ची माहिती : एजंटांना थारा नको

googlenewsNext
ठळक मुद्देनवीन वीज मीटर मुबलक उपलब्ध ‘महावितरण’ची माहिती : एजंटांना थारा नको

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रात नवीन वीजजोडण्या व नादुरुस्त वीजमीटर बदलण्यासाठी महावितरणच्या कार्यालयांमध्ये सद्य:स्थितीत सिंगल व थ्री फेजचे एक लाख १४ हजार ९८६ नवीन वीजमीटर उपलब्ध आहेत. नवीन वीजजोडणीच्या प्रक्रियेत स्वयंघोषित एजंटांनाही थारा देऊ नये, असे आवाहन ‘महावितरण’ने केले आहे.

कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे व सोलापूर जिल्ह्यांसाठी सिंगल फेजचे २५ हजार आणि १०-४० अ‍ॅम्पीअर थ्री फेजचे ५०१४ नवीन वीजमीटर नुकतेच उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

यासह आता या सर्व जिल्ह्यांमध्ये सिंगल फेजचे ९१ हजार ४४९ आणि थ्री फेज १०-४० अ‍ॅम्पीअरचे २३ हजार ५३७ नवीन वीजमीटर उपलब्ध आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात सिंगल फेजचे ६४९९, पुणे जिल्ह्यात ५१२९१, सातारा जिल्ह्यात ८२४२ सोलापूरमध्ये १०६३६, सांगली जिल्ह्यात १४,७८१ नवीन वीजमीटर उपलब्ध आहेत.

महावितरणच्या ग्राहकसेवेच्या सर्व सुविधा सुटसुटीत व पारदर्शक असतानाही स्वयंघोषित एजंट म्हणून आर्थिक फटका देणाऱ्या व्यक्तींना वीजग्राहकांनी थारा देऊ नये, असे आवाहन ‘महावितरण’ने केले आहे. महावितरणकडून वीजग्राहकांसाठी 'आॅनलाईन'सह कार्यालयीन ग्राहकसेवा अतिशय सुलभपणे राबविण्यात येत आहेत.

त्यामुळे वीजग्राहकांना कोणत्याही स्वयंघोषित एजंटांकडे जाण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे वीजग्राहकांनी अशा स्वयंघोषित एजंटांना थारा न देता महावितरणच्या सेवांचा थेट लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
 

 

Web Title: Kolhapur: New electricity meter available, information about 'Mahavitaran': Agents do not have a station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.