कोल्हापूर ‘लोकमत महामॅरेथॉन’ : चला, वाढवूया धावपटूंचा उत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2019 04:15 PM2019-01-03T16:15:42+5:302019-01-03T16:18:59+5:30

‘लोकमत महामॅरेथॉन’मध्ये काही कारणांस्तव ज्यांना सहभागी होता आलेले नाही, त्यांनी निराश होण्याची गरज नाही. या मॅरेथॉनमधील सहभागी धावपटूंचा उत्साह वाढविण्यासाठी तुम्हीदेखील या स्पर्धेत तितक्याच हिरिरीने सहभागी होऊ शकता.

Kolhapur 'Lokmat Mahamarethan': Come on, excite the runners' excitement | कोल्हापूर ‘लोकमत महामॅरेथॉन’ : चला, वाढवूया धावपटूंचा उत्साह

कोल्हापूर ‘लोकमत महामॅरेथॉन’ : चला, वाढवूया धावपटूंचा उत्साह

googlenewsNext
ठळक मुद्देकोल्हापूर ‘लोकमत महामॅरेथॉन’ चला, वाढवूया धावपटूंचा उत्साह

कोल्हापूर : ‘लोकमत महामॅरेथॉन’मध्ये काही कारणांस्तव ज्यांना सहभागी होता आलेले नाही, त्यांनी निराश होण्याची गरज नाही. या मॅरेथॉनमधील सहभागी धावपटूंचा उत्साह वाढविण्यासाठी तुम्हीदेखील या स्पर्धेत तितक्याच हिरिरीने सहभागी होऊ शकता.

‘लोकमत महामॅरेथॉन’ ही स्पर्धा कोल्हापूरच्या प्रत्येक नागरिकाची आहे. मॅरेथॉनमध्ये धावण्याबरोबरच या धावपटूंचा उत्साह वाढविणे हासुद्धा मॅरेथॉनचा महत्त्वपूर्ण भाग आहे. तो संपूर्ण शहरवासीयांना पूर्ण करायचा आहे. त्यात आपला सक्रिय सहभाग असणे आवश्यक आहे. जे युवक, युवती काही कारणांस्तव या मॅरेथॉनमध्ये धावणार नसतील, तेदेखील या महामॅरेथॉनमध्ये सहभागी होऊ शकतात.

असे युवक, युवती चेहऱ्यांवर रंग लावून, फेटे बांधून व आकर्षक पेहराव करून मार्गावर येऊ शकतात. त्यांना तारुण्याचा सळसळता जोम धावण्याबरोबरच प्रोत्साहन देण्यातही दाखविता येईल. पहाटे, मॅरेथॉन रनर्सना मनापासून ‘चीअर अप’ करता येईल. जे शहरवासीय, नागरिक धावणार नाहीत, ते आपल्या घराबाहेर येऊन मॅरेथॉन मार्गावर उभे राहून धावणाºयांचा उत्साह वाढवू शकतात. कोल्हापूरकरांचे प्रोत्साहनाचे शब्द धावपटूंचा उत्साह आणि ऊर्जा द्विगुणित करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.

उत्साह वाढविण्यासाठी हे करता येईल...

  1. टाळ्या वाजवून केलेल्या स्वागताने धावपटूंमध्ये उत्साह, ऊर्जा निर्माण करता येईल.
  2. महामॅरेथॉनच्या मार्गावर ढोल-ताशा, गीत-संगीत वाजवून अथवा लेझीम खेळून जल्लोषपूर्ण वातावरण तयार करू शकता.
  3.  या माध्यमातून परराज्यांतून, जिल्ह्यातून येणाऱ्या धावपटूंना कोल्हापूरकरांचे आदरातिथ्य अनुभवण्याची संधी मिळेल.
  4. महामॅरेथॉनमधील नामांकित धावपटूंना पाहून शाळकरी मुलांना मोठी प्रेरणा मिळू शकते. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन तेथील विद्यार्थी भविष्यात आंतरराष्ट्रीय धावपटू बनू शकतात. त्यासाठी शाळकरी मुलांनी मॅरेथॉन मार्गावर उभे राहून धावपटूंचे मनोबल वाढवावे.

 

मॅरेथॉन मार्गावर नृत्य-संगीत, मर्दानी खेळ

मॅरेथॉन मार्गावर नृत्य, संगीत, हलगीवादन, ढोल-ताशा, लेझीम, मर्दानी खेळ, आदी मनोरंजनात्मक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. सोबतचा झुम्बा डान्स धावपटूंमध्ये धावण्यासाठी ऊर्जा निर्माण करणार आहे. मॅरेथॉनच्या मार्गावर लेझीम, ढोल-ताशे, गाणे, संगीत वाजवून, लेझीम खेळून जल्लोषपूर्ण वातावरण ठेवले जाणार आहे.


निरोगी आरोग्यासाठी व्यायाम आवश्यक

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने सन २००१ मध्ये पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून ‘विद्याप्रबोधिनी’ची कोल्हापुरात सुरुवात झाली. प्रबोधिनीतर्फे एमपीएससी, यूपीएससी, बँकिंग, एमबीए, आदी परीक्षांसह करिअरबाबत मार्गदर्शन केले जाते. शासकीय अधिकाऱ्यांच्या सक्सेस स्टोरीज, त्यांची व्याख्याने, चर्चासत्रे, प्रेरणादायी वक्त्यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी आयोजित केले जाते. दिल्ली, मुंबई, पुणे येथील तज्ज्ञांना मार्गदर्शनासाठी निमंत्रित केले जाते. विद्यार्थ्यांसाठी अद्ययावत ग्रंथालयाची सुविधा उपलब्ध आहे. आतापर्यंत क्लार्क ते अधिकारी या पदांच्या परीक्षेत प्रबोधिनीचे ७० हून अधिक विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. रक्तदान शिबिरासह विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. सध्याच्या धावपळ आणि ताणतणावाच्या स्थितीत निरोगी जीवनशैलीसाठी व्यायाम गरजेचा आहे. त्या दृष्टीने आरोग्याबाबत सजग करणारा ‘लोकमत’चा महामॅरेथॉन हा उपक्रम उल्लेखनीय आहे. निरोगी आरोग्यासाठी व्यायाम आणि निरोगी मनासाठी वाचन हे महत्त्वाचे आहे.
- राहुल चिकोडे,
अध्यक्ष, विद्याप्रबोधिनी

 

Web Title: Kolhapur 'Lokmat Mahamarethan': Come on, excite the runners' excitement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.