कोल्हापूर : कडक उन्हाने कोल्हापूरकर घामाघूम, पारा ४२ डिग्रीपर्यंत : जीवघेण्या उष्म्याने नागरिक हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 07:06 PM2018-04-23T19:06:59+5:302018-04-23T19:06:59+5:30

दिवसेंदिवस कोल्हापूरच्या तापमानात कमालीची वाढ होत असून, सोमवारी तापमानाने उच्चांकी गाठली. दिवसभरात ४२ डिग्रीपर्यंत पारा चढल्याने कडक उन्हाने कोल्हापूरकर अक्षरश: घामाघूम झाले. सायंकाळी पाच वाजले तरी उन्हाची तिरप अंग भाजून काढत असल्याने घराबाहेर पडणेच मुश्कील झाले आहे.

Kolhapur: Kolhapurkar Ghamaghoom, mercury upto 42 degrees: Citizen's hemorrhoids with fatal heat | कोल्हापूर : कडक उन्हाने कोल्हापूरकर घामाघूम, पारा ४२ डिग्रीपर्यंत : जीवघेण्या उष्म्याने नागरिक हैराण

कोल्हापूर : कडक उन्हाने कोल्हापूरकर घामाघूम, पारा ४२ डिग्रीपर्यंत : जीवघेण्या उष्म्याने नागरिक हैराण

Next
ठळक मुद्देकडक उन्हाने कोल्हापूरकर घामाघूम, पारा ४२ डिग्रीपर्यंत जीवघेण्या उष्म्याने नागरिक हैराण

कोल्हापूर : दिवसेंदिवस कोल्हापूरच्या तापमानात कमालीची वाढ होत असून, सोमवारी तापमानाने उच्चांकी गाठली. दिवसभरात ४२ डिग्रीपर्यंत पारा चढल्याने कडक उन्हाने कोल्हापूरकर अक्षरश: घामाघूम झाले. सायंकाळी पाच वाजले तरी उन्हाची तिरप अंग भाजून काढत असल्याने घराबाहेर पडणेच मुश्कील झाले आहे.

गतवर्षीच्या तुलनेत यंदा कोल्हापूरच्या तापमानात कमालीची वाढ झाली आहे. या तापमानाची झलक जानेवारी-फेबु्रवारीपासूनच कोल्हापूरकरांना अनुभवयास आली होती. मार्च महिन्यात तापमान ३७ ते ३८ डिग्रीपर्यंत पोहोचले होते, त्यामुळे एप्रिलमध्ये काय होणार, याचा अंदाज नागरिकांना आला होता.

एप्रिल महिना सुरू झाल्यापासून तापमानात हळूहळू वाढ होत गेली. गेले दोन दिवस तर सूर्य आग ओकणे आहे. सकाळी आठ वाजल्यापासूनच उन्हाचा तडाका जाणवतो. जसजसा सूर्य डोक्यावर येतो, तसतशी उन्हाची तीव्रता वाढत जाते. दुपारी बारानंतर तर घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे सायंकाळी पाचपर्यंत शहरातील रस्त्यावर तुरळकच वाहतूक सुरू राहते. दुचाकी वाहनधारकांनातर संपूर्ण अंग कपड्यांनी झाकूनच बाहेर पडावे लागते.

सोमवारी दिवसभरात ४२ डिग्रीपर्यंत तापमान पोहोचले. किमान तापमान २० डिग्रीपर्यंत राहिल्याने वातावरणात उष्मा कायम राहिला. आगामी दोन दिवसांत तापमान असेच राहील, असा अंदाज हवामान खात्याचा आहे.

गरम वाफांनी अंगाला चटके

दुपारी रस्त्यावरून जाताना डोक्यावर उन्हाचा तडाका आणि तप्त झालेल्या रस्त्यातून येणाऱ्या गरम वाफेतून अंगाला अक्षरश: चटके बसतात. वाहनचालकांना याचा जास्त त्रास होत असून, वाहनांच्या इंजिनची गरम वाफ, रस्त्यातून अंगावर येणाºया गरम वाफा आणि डोक्यावरील रणरणते ऊन यामुळे वाहन चालवताना कसरतच करावी लागते.

असे राहणार तापमान, डिग्रीमध्ये

वार             किमान            कमाल
सोमवार        २०                 ४२
मंगळवार      २०                ४०
बुधवार         २०                ४१
गुरुवार         २०                ४०
शुक्रवार        २१                 ४१
 

 

Web Title: Kolhapur: Kolhapurkar Ghamaghoom, mercury upto 42 degrees: Citizen's hemorrhoids with fatal heat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.