कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात साकारला संशोधनाचा ‘आविष्कार’. कलिंगडच्या बियांचा केक, महामार्गावर वीज निर्मिती; मध्यवर्ती महोत्सवाला गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 10:50 AM2018-01-06T10:50:05+5:302018-01-06T10:56:00+5:30

रद्दीपासून इथेनॉल निर्मिती, पाणी आणि तेल वेगळे करणारे यंत्र, महामार्गावरील वाहनांच्या वेगावर वीज निर्मिती, कलिंगडच्या बियांपासूनचा प्रथिनेयुक्त असे विविध स्वरूपातील संशोधन शिवाजी विद्यापीठामध्ये पाहायला मिळाले. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी मध्यवर्ती आविष्कार महोत्सवात आपले संशोधन सादर केले. हे संशोधन पाहण्यासाठी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी गर्दी केली होती.

Kolhapur: The 'invention' of the research conducted at Shivaji University Kalangad's seed cake, electricity generation on the highway; The intermediate celebration crowd | कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात साकारला संशोधनाचा ‘आविष्कार’. कलिंगडच्या बियांचा केक, महामार्गावर वीज निर्मिती; मध्यवर्ती महोत्सवाला गर्दी

शिवाजी विद्यापीठात शुक्रवारी झालेल्या मध्यवर्ती आविष्कार संशोधन महोत्सवातील विविध प्रकल्प पाहण्यास विद्यार्थिनींनी गर्दी केली होती. (छाया : नसीर अत्तार)

Next
ठळक मुद्देकोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आविष्कार महोत्सवात संशोधन महोत्सवात विविध संशोधन प्रकल्पराहुरी येथील कृषी विद्यापीठात दि. १५ ते १७ जानेवारीदरम्यान राज्यस्तरीय महोत्सवराज्यस्तरीय महोत्सवासाठी शिवाजी विद्यापीठातील ४८ स्पर्धक

कोल्हापूर : रद्दीपासून इथेनॉल निर्मिती, पाणी आणि तेल वेगळे करणारे यंत्र, महामार्गावरील वाहनांच्या वेगावर वीज निर्मिती, कलिंगडच्या बियांपासूनचा प्रथिनेयुक्त असे विविध स्वरूपातील संशोधन शिवाजी विद्यापीठामध्ये पाहायला मिळाले. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी मध्यवर्ती आविष्कार महोत्सवात आपले संशोधन सादर केले. हे संशोधन पाहण्यासाठी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी गर्दी केली होती.


शिवाजी विद्यापीठात शुक्रवारी झालेल्या मध्यवर्ती आविष्कार संशोधन महोत्सवात कऱ्हाडच्या एस. जी. एम. कॉलेजची विद्यार्थिनी रूचिता चव्हाण हिने पाणी व तेल वेगळे करणाऱ्या यंत्राचा प्रकल्प सादर केला. (छाया : नसीर अत्तार)

विद्यापीठातील लोककला केंद्रात सकाळी अकरा वाजता प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते ‘आविष्कार’चे उद्घाटन झाले. यावेळी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे, वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, स्कूल आॅफ नॅनो सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजीचे समन्वयक प्रा. डॉ. पी. एस. पाटील, महोत्सवाचे समन्वयक डॉ. ए. एम. गुरव, आदी उपस्थित होते.

उद्घाटनानंतर प्रमुख उपस्थितांनी महोत्सवातील विविध संशोधन प्रकल्प पाहिले. या महोत्सवात न्यू कॉलेजमधील यश आंबोळे याने महामार्गावरील वाहनांच्या वेगावर वीज निर्मितीचे संशोधन सादर केले. जे. जे. मगदूम इंजिनिअरिंग कॉलेजच्या सौरभ थोरात, नयन साजणे, सुदर्शन सुतार, शिवप्रसाद शिंत्रे यांनी थ्री डी प्रिंटर डेव्हलपमेंट फॉर वॅक्स पॅटर्नचा प्रकल्प मांडला.

सायबर इन्स्टिट्यूटमधील नम्रता विभूते हिने कलिंगडच्या बियांपासून बनविलेला प्रथिनेयुक्त केक सादर केला. कऱ्हाडच्या एसजेएम कॉलेजच्या रूचिता चव्हाण हिने पाण्यामध्ये मिसळलेले तेल वेगळे करणारे यंत्राचा प्रकल्प सादर केला. त्याच कॉलेजमधील ऋतुजा थोरात हिने रद्दीपासून इथेनॉल निर्मितीचे संशोधन मांडले.

दरम्यान, या महोत्सवात मानव्यशास्त्र, वाणिज्य, मूलभूत विज्ञान, शेती व पशुसंवर्धन,अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, वैद्यकशास्त्र व औषधशास्त्र प्रकारातील या महोत्सवात ३६ पदव्युत्तर संशोधक, शिक्षक, विद्यार्थी स्पर्धक सहभागी झाले होते.

राज्यस्तरीय महोत्सवासाठी ४८ स्पर्धक

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात दि. १५ ते १७ जानेवारीदरम्यान राज्यस्तरीय आविष्कार संशोधन महोत्सव होणार आहे. त्यामध्ये शिवाजी विद्यापीठातून पदवी, पदव्युत्तर, शिक्षक आदी गटांतून एकूण ४८ स्पर्धक सहभागी होणार आहेत, अशी माहिती विद्यापीठातील महोत्सवाचे समन्वयक डॉ. ए. एम. गुरव यांनी दिली.
 

 

Web Title: Kolhapur: The 'invention' of the research conducted at Shivaji University Kalangad's seed cake, electricity generation on the highway; The intermediate celebration crowd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.