कोल्हापूर : दिल्लीतील शिवजयंतीमध्ये पाच राज्यांतील शिवभक्तांचा सहभाग, संभाजीराजे यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 03:30 PM2018-02-12T15:30:31+5:302018-02-12T15:43:10+5:30

दिल्ली येथे १९ फे ब्रुवारीला होणाऱ्या शिवजयंती सोहळ्यास महाराष्ट्रासह दिल्ली, उत्तरप्रदेश, हरियाणा आणि राजस्थान या पाच राज्यांतील शिवभक्त उपस्थित राहणार असल्याची माहिती खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिली. हजारो कलाकारांसह हत्ती आणि घोड्यांचा समावेश असलेली शिवछत्रपतींची मिरवणूक दिल्लीत लक्षवेधी ठरेल, असा विश्वास त्यांनी रविवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

Kolhapur: Information about SambhajiRaje in Shivajanti | कोल्हापूर : दिल्लीतील शिवजयंतीमध्ये पाच राज्यांतील शिवभक्तांचा सहभाग, संभाजीराजे यांची माहिती

कोल्हापूर : दिल्लीतील शिवजयंतीमध्ये पाच राज्यांतील शिवभक्तांचा सहभाग, संभाजीराजे यांची माहिती

Next
ठळक मुद्देसंभाजीराजे यांची माहिती हजारो कलाकारांसह हत्ती, घोड्यांचा सहभाग

कोल्हापूर : दिल्ली येथे १९ फेब्रुवारीला होणाऱ्या शिवजयंती सोहळ्यास महाराष्ट्रासह दिल्ली, उत्तरप्रदेश, हरियाणा आणि राजस्थान या पाच राज्यांतील शिवभक्त उपस्थित राहणार असल्याची माहिती खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिली. हजारो कलाकारांसह हत्ती आणि घोड्यांचा समावेश असलेली शिवछत्रपतींची मिरवणूक दिल्लीत लक्षवेधी ठरेल, असा विश्वास त्यांनी रविवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

संभाजीराजे म्हणाले, शिवराज्याभिषेक समितीच्या माध्यमातून एकीकडे राज्याभिषेक हा लोकोत्सव करण्यामध्ये आम्हांला यश आले. मात्र आता शिवजयंती ही ‘राष्ट्रोत्सव’ व्हावा, या भूमिकेतून मी गेल्या वर्षी ‘शिवनेरी’वरच पुढील वर्षी दिल्ली शिवजयंती उत्सव घेणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार सर्व पातळ्यांवर नियोजन सुरू आहे.

शोभायात्रेत पुण्याचे ३०० कलाकारांचे स्वराज्य ढोलपथक, ६० कलाकारांचे ध्वजपथक, १२ कलाकारांचे तुतारी पथक, २०० जणांची वारकरी दिंडी, ७० कलाकारांचे लेझीम पथक, १२ जणांचे हलगी पथक, २० जणांचे शाहिरी पथक, ८० कलाकारांचे मर्दानी खेळ, २५ जणांचे मल्लखांब पथक, ५० जणांचे धनगरी ढोलपथक तसेच पूर्वोत्तर राज्यांतील लोककलाकार त्यांच्या पारंपरिक वेशभूषेत सहभागी होणार आहेत.

शाहीर आझाद नायकवडी प्रथमच शिवाजी महाराजांचा हिंदीतून पोवाडा यावेळी सादर करणार आहेत. पत्रकार परिषदेला शिवराज्याभिषेक उत्सव समितीचे फत्तेसिंह सावंत, विनायक फाळके, स्वप्निल यादव, अमर पाटील, हेमंत साळोखे, राम यादव, मकरंद ऐतवडे, उदय घोरपडे, प्रसन्न मोहिते उपस्थित होते.

असा असेल कार्यक्रम

१९ फेब्रुवारी

  1. सकाळी ९ वाजता- संसद परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन.
  2. सकाळी १०.१० वाजता- नवीन महाराष्ट्र सदन येथे शिवजन्मोत्सव सोहळा व शाहिरी कार्यक्रम
    (मराठमोळ्या वेशामध्ये ५०० महिलांचा सहभाग)
  3. सकाळी ११.००- महाराष्ट्र सदन, कस्तुरबा गांधी मार्ग, राजपथ ते इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्रापर्यंत शोभायात्रा
  4. दुपारी १ वाजता- शिवकालीन युद्धकलेची प्रात्यक्षिके, महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांची छायाचित्रे व ऐतिहासिक नाण्यांचे प्रदर्शन, माहितीपटाचे सादरीकरण, रक्तदान शिबिर, प्रमोद मांडे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन.
  5. सायंकाळी ६ वाजता- मुख्य कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन.
  6. सायंकाळी ७ वाजता- शिवछत्रपतींच्या जीवनचरित्रावर आधारित ‘शिवगर्जना’ महानाट्याचा प्रयोग.

२० फेब्रुवारी

  1. सायंकाळी ७ वाजता ‘शिवगर्जना’ प्रयोगाचे पुन्हा सादरीकरण.
     

 

Web Title: Kolhapur: Information about SambhajiRaje in Shivajanti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.