कोल्हापूर : कसबा बावडा येथील बाजारातून सोन्याचे बदाम लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 02:22 PM2018-07-02T14:22:55+5:302018-07-02T14:24:12+5:30

कसबा बावडा येथील बाजारातून चार वर्षाच्या मुलाच्या गळ्यातील सोन्याचे बदाम चोरट्याने हातोहात लंपास केले. ही घटना रविवारी (दि. १) रोजी घडली.

Kolhapur: Gold almond lamps from the market in Kasba Bavda | कोल्हापूर : कसबा बावडा येथील बाजारातून सोन्याचे बदाम लंपास

कोल्हापूर : कसबा बावडा येथील बाजारातून सोन्याचे बदाम लंपास

Next
ठळक मुद्देकसबा बावडा येथील बाजारातून सोन्याचे बदाम लंपासशाहुपूरी पोलीसांत फिर्याद

कोल्हापूर : कसबा बावडा येथील बाजारातून चार वर्षाच्या मुलाच्या गळ्यातील सोन्याचे बदाम चोरट्याने हातोहात लंपास केले. ही घटना रविवारी (दि. १) रोजी घडली.

अधिक माहिती अशी, राहुल बंडोपंत मगदूम (वय ४३, रा. मानसी अपार्टमेंन्ट, रणदिवे गल्ली, कसबा बावडा) हे पत्नी वृषाली, भावजय नेहा व मुलगा राजवीर यांना घेवून कसबा बावडा येथील आठवडी बाजारात भाजीपाला खरेदीसाठी गेले होते.

गर्दीचा फायदा घेत चोरट्याने त्यांच्या मुलाच्या गळ्यातील सोन्याचे बदाम चोरुन नेले. याप्रकरणी त्यांनी शाहुपूरी पोलीसांत फिर्याद दिली. या बाजारपेठेमध्ये ग्राहकांचे मोबाईल, पाकिटे, पर्स चोरीला जातात.

शाहुपूरी पोलीसात या बाजारपेठेतील शेकडो चोऱ्यांची नोंद आतापर्यंत झाली आहे. पोलीस दूर्लक्ष करीत असल्याने चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.
 

 

Web Title: Kolhapur: Gold almond lamps from the market in Kasba Bavda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.