कोल्हापूर जिल्'ातील ४७२ ग्रामपंचायतींची रणधुमाळी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 11:59 PM2017-09-22T23:59:39+5:302017-09-23T00:06:18+5:30

In Kolhapur district, 472 Gram Panchayats are in the starting line | कोल्हापूर जिल्'ातील ४७२ ग्रामपंचायतींची रणधुमाळी सुरू

कोल्हापूर जिल्'ातील ४७२ ग्रामपंचायतींची रणधुमाळी सुरू

Next
ठळक मुद्देपहिल्या दिवशी सरपंचपदासाठी ४१ अर्ज दाखल

 




: ग्रामपंचायत सदस्य पदासाठी ५३ अर्ज दाखल : आज, उद्या अर्ज भरण्यासाठी

लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जिल्'ातील ४७२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी शुक्रवारी सुरू झाली. तालुक्याच्या ठिकाणी अर्ज दाखल करण्यासाठी व माहिती घेण्यासाठी इच्छुक व समर्थकांची गर्दी झाली. उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी जिल्'ात थेट सरपंचपदासाठी ४१ उमेदवारांनी ४१ अर्ज दाखल केले; तर ग्रामपंचायत सदस्यपदासाठी ५३ जणांनी ५३ अर्ज दाखल केले. सरपंचपदासाठी सर्वाधिक पन्हाळा तालुक्यात आठ अर्ज दाखल झाले. आज, शनिवार व उद्या, रविवारी सुटी असली तरी या दिवशी उमेदवारांना आॅनलाईन अर्ज भरता यावेत, यासाठी महा-ईसेवा केंद्रे व संग्राम केंद्रे सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हा निवडणूक विभागाने दिले आहेत.
जिल्'ातील ४७२ ग्रामपंचायतींसाठी १६ आॅक्टोबरला मतदान होत असून, १७ आॅक्टोबरला निकाल घोषित होणार आहे. याच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला शुक्रवारपासून सुरुवात झाली. सकाळी ११ ते दुपारी ४.३० या वेळेत हे अर्ज दाखल करण्यात येत होते. पहिलाच दिवस असल्याने अर्ज भरण्याबरोबरच उमेदवारी अर्ज कसे भरायचे याची माहिती घेण्यासाठी इच्छुकांसह समर्थकांनी निवडणूक कार्यालयांमध्ये गर्दी केली होती. अर्ज भरण्याची प्रक्रिया आॅनलाईन असल्याने, अर्ज भरून त्याची प्रिंट व त्यासोबत रहिवासी दाखला, संपत्ती विवरणपत्र, शौचालय असल्याचा दाखला, चारित्र्याचा दाखला, आदी कागदपत्रे निवडणूक अधिकाºयांकडे सादर केली जात होती. तालुक्याच्या ठिकाणी निवडणूक कार्यालयांमध्ये उमेदवारी अर्ज सादर करण्याची प्रक्रिया सुरू होती.
पहिल्या दिवशी जिल्'ात थेट सरपंचपदासाठी ४१ उमेदवारांनी ४१ अर्ज दाखल केले; तर ग्रामपंचायत सदस्यपदासाठी ५३ उमेदवारांनी ५३ अर्ज दाखल केले. यामध्ये सरपंचपदासाठी सर्वाधिक आठ अर्ज हे पन्हाळा तालुक्यात दाखल झाले. त्याखालोखाल गडहिंग्लजमध्ये सात, तर करवीर व हातकणंगलेमध्ये प्रत्येकी सहा अर्ज दाखल झाले. ग्रामपंचायत सदस्यपदासाठी सर्वाधिक १३ उमेदवारी अर्ज करवीर तालुक्यात दाखल करण्यात आले.
आज, शनिवार व उद्या, रविवारी सुटी असल्याने उमेदवारी अर्ज दाखल करता येणार नाहीत; परंतु इच्छुकांच्या सोईसाठी त्यांना आॅनलाईनद्वारे अर्ज भरता यावेत, यासाठी या दोन्ही दिवशी महा-ई-सेवा केंद्रे व संग्राम केंद्रे सुरू ठेवावीत, असे आदेश जिल्हा निवडणूक विभागाद्वारे देण्यात आले आहेत.
---------------------------------
दाखल झालेले उमेदवारी अर्ज असे
तालुका सरपंच सदस्य
उमेदवार अर्ज संख्या उमेदवार अर्जसंख्या
राधानगरी ४ ४ ८ ८
कागल ० ० १ १
करवीर ६ ६ १३ १३
गगनबावडा ० ० ० ०
आजरा ४ ४ ४ ४
भुदरगड २ २ ० ०
हातकणंगले ६ ६ ११ ११
शिरोळ १ १ १ १
शाहूवाडी ३ ३ ३ ३
पन्हाळा ८ ८ ९ ९
चंदगड ० ० ० ०
गडहिंग्लज ७ ७ ३ ३

 कोल्हापूर जिल्'ात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला शुक्रवारपासून सुरुवात झाली. उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी कोल्हापुरातील रमणमळा येथील शासकीय बहुउद्देशीय हॉल येथील करवीर निवडणूक कार्यालयात अर्ज भरण्याबाबत इच्छुकांनी निवडणूक कर्मचाºयांकडून माहिती घेतली.

 

Web Title: In Kolhapur district, 472 Gram Panchayats are in the starting line

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.