कोल्हापूर : धनंजय गुंडे पंचत्वात विलीन, मान्यवरांनी घेतले अंत्यदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 01:20 PM2018-04-26T13:20:28+5:302018-04-26T13:20:28+5:30

कोल्हापूर येथील ख्यातनाम योगतजज्ञ डॉ. धनंजय गुंडे यांच्यावर गुरूवारी दुपारी पंचगंगा स्मशानभूमीमध्ये भावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी सकाळी अनेक मान्यवरांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. डॉ. गुंडे यांचे बुधवारी सकाळी केरळमधील कल्पेट जि. वायनाड येथे ह्दयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते.

Kolhapur: Dhananjay Gunday merged with Panchayat | कोल्हापूर : धनंजय गुंडे पंचत्वात विलीन, मान्यवरांनी घेतले अंत्यदर्शन

कोल्हापूर : धनंजय गुंडे पंचत्वात विलीन, मान्यवरांनी घेतले अंत्यदर्शन

googlenewsNext
ठळक मुद्देधनंजय गुंडे पंचत्वात विलीन मान्यवरांनी घेतले अंत्यदर्शन

कोल्हापूर : येथील ख्यातनाम योगतजज्ञ डॉ. धनंजय गुंडे यांच्यावर गुरूवारी दुपारी पंचगंगा स्मशानभूमीमध्ये भावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी सकाळी अनेक मान्यवरांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. डॉ. गुंडे यांचे बुधवारी सकाळी केरळमधील कल्पेट जि. वायनाड येथे ह्दयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते.

बुधवारी सायंकाळी एअर अ‍ॅम्ब्युलन्सने डॉ. गुंडे यांचे पार्थिव कोल्हापूरला आणण्यात आले. पार्थिवासोबत त्यांच्या पत्नी ललिता व कन्या कविता केरळहून कोल्हापुरात आल्या. डॉ. डी.वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये त्यांचे पार्थिव ठेवण्यात आले होते.

गुरूवारी सकाळी साडे सातच्या सुमारास त्यांचे पार्थिव शिवाजी पार्कमधील ‘कृष्णा’ निवासस्थानी आणण्यात आले. यावेळी त्यांच्या पत्नी ललिता, कन्या कविता आणि डॉ. सुचेता यांना अश्रू अनावर झाले. यावेळी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबतच सर्वसामान्य नागरिकांनीही गर्दी केली होती.

त्यांचे केरळमधील जावई श्रेयमंसकुमार हे गुरूवारी सकाळी मेंगलोरहून चाटर्र विमानाने कोल्हापुरात आले. यानंतर डॉ.गुंडे यांचे पार्थिव शववाहिकेतून पंचगंगा स्मशानभूमीमध्ये आणण्यात आले. तेथे श्रेयंसकुमार यांनी त्यांच्या पार्थिवाला अग्नी दिला.

यावेळी त्यांचे दुसरे जावई सलीम लाड यांच्यासह अन्य नातेवाईक उपस्थित होते. यावेळी ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले यांनी अंत्यदर्शन घेतले. सायंकाळी सहा वाजता अस्थिविसर्जन करण्यात आले.

तत्पूर्वी सकाळी खासदार धनंजय महाडिक, आमदार सतेज पाटील, माजी खासदार कल्लापाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, बांधकाम व्यावसायिक व्ही. बी. पाटील, अ‍ॅड. के. अ‍े. कापसे, प्रा. बी. ए. चौगुले, डॉ. सुनील पाटील, डॉ. रावसाहेब पाटील, नितीन आडके, डॉ.पी. एम. चौगुले, सुभाष चौगुले, दक्षिण भारत जैन सभेचे प्रा. डी. ए. पाटील, सागर चौगुले, नगरसेवक राहूल चव्हाण यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
 

 

Web Title: Kolhapur: Dhananjay Gunday merged with Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.