कोल्हापूर : भारत-पाकिस्तानमध्ये क्रिकेट सामने व्हावेत : अजित वाडेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 05:20 PM2018-02-23T17:20:07+5:302018-02-23T17:49:24+5:30

क्रिकेटची भारतातील लोकप्रियता पाहता, क्रिकेट जगतात भारत पाकिस्तानच्या एक पाऊल पुढे आहे. त्यामुळे येत्या काळात भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये क्रिकेटचे सामने व्हावेत, असे मत भारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांनी शुक्रवारी व्यक्त केले. दिव्यांगांच्या पश्चिम विभागीय क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी शाहूपुरी जिमखाना येथे आयोजित केलेल्या वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते.

Kolhapur: Cricket matches in India and Pakistan: Ajit Wadekar | कोल्हापूर : भारत-पाकिस्तानमध्ये क्रिकेट सामने व्हावेत : अजित वाडेकर

कोल्हापूर : भारत-पाकिस्तानमध्ये क्रिकेट सामने व्हावेत : अजित वाडेकर

Next
ठळक मुद्देभारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांच्याशी वार्तालाप दिव्यांगांच्या पश्चिम विभागीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटनदिग्गजांना नवोदितांची भीती : वाडेकर

कोल्हापूर : क्रिकेटची भारतातील लोकप्रियता पाहता, क्रिकेट जगतात भारत पाकिस्तानच्या एक पाऊल पुढे आहे. त्यामुळे येत्या काळात भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये क्रिकेटचे सामने व्हावेत, असे मत भारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांनी शुक्रवारी व्यक्त केले. दिव्यांगांच्या पश्चिम विभागीय क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी शाहूपुरी जिमखाना येथे आयोजित केलेल्या वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते.

वाडेकर म्हणाले, दिव्यांगांसाठीची ही स्पर्धा गेली अनेक वर्षांपासून सुरू आहे. या स्पर्धेमधून अनेक नवीन खेळाडू घडत आहेत. आपल्या संघाने बांगलादेश संघाला सामना खेळण्यासाठी आमंत्रित केले आहे, तसेच इंग्लंडमध्ये आपल्या संघाला आमंत्रित करण्यात आले आहे.

२८ राज्यांत दिव्यांग सामने खेळले जातात. प्रत्येक झोनमध्ये ही स्पर्धा घेतली जाते. ४० टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व आलेल्या खेळाडूंना या स्पर्धेत सहभागी होता येते. पूर्वी सॉफ्टबॉलने खेळली जाणारी ही स्पर्धा आता टणक चेंडूने खेळली जाते.

आजच्या क्रिकेटमध्ये भारतीय क्रिकेट संघ सर्वोत्तम बनला आहे. आज आय. पी. एल.सारख्या स्पर्धा क्रिकेटच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. चांगल्या नवीन खेळाडूंना या स्पर्धांतून संधी मिळते. मोठ्या खेळाडूंबरोबर खेळल्याने नवीन खेळाडूंना अनुभव मिळतो. भारतीय क्रिकेटच्या चाहत्यांना भारताने राजकीय मतभेद बाजूला ठेवून त्रयस्त ठिकाणी खेळून पाकिस्तानला हरविले तर आनंद होतो; त्यामुळे परदेशात कुठेही भारत व पाकिस्तान यांच्यात सामने व्हावेत. त्यांना सर्वाधिक क्रिकेटप्रेमींची गर्दी होते व ते विविध चित्रवाहिन्यांवर पाहिलेही जातात.

खेळाडूंना अधिक आर्थिक लाभ होत असल्याने भविष्यात आणखी मोठ्या संख्येने मुले क्रिकेटकडे वळतील. ‘आयसीसी’चे तत्कालीन अध्यक्ष जगमोहन दालमियांच्या काळात क्रिकेटमध्ये मोठ्या प्रमाणात पैसा आला. त्यामध्ये शरद पवार यांच्या काळात आणखी वाढ झाली. त्याचा फायदा जुन्या व नव्या खेळाडूंना होऊ लागला. यावेळी माजी कसोटीपटू उमेश कुलकर्णी, शाहूपुरी जिमखान्याचे अध्यक्ष विनोद कांबोज, संजय शेट्ये, राजेश पाटील, विजय भोसले, केशव जाधव, गिरीश शेवने, आदी उपस्थित होते.

दिग्गजांना नवोदितांची भीती

वर्षाच्या १२ महिन्यांतील आठ महिने क्रिकेटचे सामने होत आहेत. यात टिकायचे असेल तर तंदुरुस्तीला अधिक प्राधान्य दिले आहे. त्यामुळे महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, युवराज सिंग, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, आदी खेळाडू तंदुरुस्तीवर भर देत आहेत; कारण त्यांना माहीत आहे की, नवोदित आपल्याला पाठीमागे टाकतील. निवड समितीही तंदुरुस्त असणाऱ्या खेळाडूंना संघात स्थान देते. त्यामुळे नवोदितांच्या भीतीपोटी दिग्गज खेळाडूही तंदुरुस्तीवर अधिक लक्ष देत आहेत, असेही वाडेकर यांनी स्पष्ट केले.

 

Web Title: Kolhapur: Cricket matches in India and Pakistan: Ajit Wadekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.