कोल्हापूर : विभागीय क्रीडा संकुलातील प्रलंबित कामे पुर्ण करणार : चंद्रकांत पाटील; इन्टरझोन स्पर्धेचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 06:31 PM2018-02-19T18:31:41+5:302018-02-19T18:36:00+5:30

कोल्हापूर विभागीय क्रीडा संकुलातील प्रलंबित कामे नजिकच्या काळात प्राधान्याने पुर्ण करुन हे संकुल पुर्णक्षमतेने कार्यान्वित केले जाईल, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी येथे केले.

Kolhapur: Completing the pending work in the departmental sports complex: Chandrakant Patil; Interjone competition concludes | कोल्हापूर : विभागीय क्रीडा संकुलातील प्रलंबित कामे पुर्ण करणार : चंद्रकांत पाटील; इन्टरझोन स्पर्धेचा समारोप

कोल्हापूर : विभागीय क्रीडा संकुलातील प्रलंबित कामे पुर्ण करणार : चंद्रकांत पाटील; इन्टरझोन स्पर्धेचा समारोप

googlenewsNext
ठळक मुद्देकोल्हापूर विभागीय क्रीडा संकुलातील प्रलंबित कामे पुर्ण करणार : चंद्रकांत पाटीलसिनियर इन्टरझोन स्पर्धेचा समारोप

कोल्हापूर : विभागीय क्रीडा संकुलातील प्रलंबित कामे नजिकच्या काळात प्राधान्याने पुर्ण करुन हे संकुल पुर्णक्षमतेने कार्यान्वित केले जाईल, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी येथे केले.

महाराष्ट्र स्टेट लॉन टेनिस असोसिशन आणि रेसिडेन्सी क्लबतर्फे विभागीय क्रीडा संकुलामध्ये आयोजित केलेल्या सिनियर इन्टरझोन स्पर्धेच्या समारोपाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी असोसिएशनचे उपाध्यक्ष राजू देसाई, रेसिडेन्सी क्लबचे खलील अन्सारी, डॉ. सत्यवत सबनिस, डॉ. दिपक जोशी, शितल भोसले प्रमुख उपस्थित होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले, विभागीय क्रीडा संकुल पुर्णक्षमतेने कार्यन्वित करण्यावर शासनाचा अधिक भर आहे. या क्रीडा संकुलातील अ‍ॅथलेटिक, जलतरण तलावासह अन्य विविध प्रकल्पांचे काम पुर्ण करुन ही दालने क्रीडाप्रेमींसाठी लवकरात लवकर उपलब्ध करुन देण्यास प्राधान्य दिले आहे. क्रीडा क्षेत्रातील विविध संघटना व असोसिशन यांच्या सक्रीय सहभागाने या संकुलामध्ये विविध स्पर्धांचे आयोजन व्हावे.

रेसिडेन्सी क्लबचे खलील अन्सारी म्हणाले, विभागीय क्रीडा संकुलामध्ये अद्ययावत सिंथेटिक टेनिस कार्ट, निर्माण करणे गरजेचे आहे त्यामुळे राष्ट्रीय अंतरराष्ट्रीय टुर्नामेंटस याठिकाणी घेणे शक्य होईल. या कार्यक्रमात असोसिएशनचे शितल भोसले यांनी प्रास्ताविक केले. डॉ. सत्यवत सबनिस यांनी आभार मानले.

क्रीडा फेस्टिवलसाठी सहकार्य

कोल्हापुरात क्रीडा फेस्टिव्हल आयोजित करुन विविध खेळांच्या स्पर्धा घेण्याबाबत स्टेट लॉन टेनिस असोसिएशनने यावेळी सुचविले. यावर पालकमंत्री पाटील म्हणाले, क्रीडा फेस्टिवलसाठी स्टेट लॉन टेनिस असोशियशनने पुढाकार घ्यावा, शासनातर्फे क्रीडा फेस्टिव्हलसाठी सवर्ते सहकार्य केले जाईल.
 

 

Web Title: Kolhapur: Completing the pending work in the departmental sports complex: Chandrakant Patil; Interjone competition concludes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.