कोल्हापूर : श्री क्षेत्र नृसिंहवाडीत शनिवारपासून दत्त जन्मकाळ सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 01:13 PM2018-12-20T13:13:16+5:302018-12-20T13:18:17+5:30

श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्तजयंती सोहळ्याची तयारी पूर्ण झाली असून, शनिवारी (दि. २२) सायंकाळी पाच वाजता मुख्य मंदिरात दत्त जन्मकाळ सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्त देवसंस्थानचे अध्यक्ष विकास पुजारी व सचिव प्राचार्य गुंडो पुजारी यांनी दिली.

Kolhapur: Birthday ceremony of Dattatreya in Shree Sector Nrusinhwad | कोल्हापूर : श्री क्षेत्र नृसिंहवाडीत शनिवारपासून दत्त जन्मकाळ सोहळा

कोल्हापूर : श्री क्षेत्र नृसिंहवाडीत शनिवारपासून दत्त जन्मकाळ सोहळा

Next
ठळक मुद्देनृसिंहवाडीत शनिवारपासून दत्त जन्मकाळ सोहळाविकास पुजारी, गुंडो पुजारी यांची माहिती

कोल्हापूर /नृसिंहवाडी : श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्तजयंती सोहळ्याची तयारी पूर्ण झाली असून, शनिवारी (दि. २२) सायंकाळी पाच वाजता मुख्य मंदिरात दत्त जन्मकाळ सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्त देवसंस्थानचे अध्यक्ष विकास पुजारी व सचिव प्राचार्य गुंडो पुजारी यांनी दिली.

येथील दत्तजयंती सोहळ्यासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, गुजरात, आदी राज्यांतून अनेक भाविक दर्शनासाठी हजेरी लावतात. भाविकांना दर्शनाची सोय व्हावी, यासाठी येथील श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्त देव संस्थानमार्फत अनेक सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

दत्तजयंतीनिमित्त दत्त मंदिरात काकड आरती व शोड्षोपचार पूजा, पंचामृत अभिषेक, श्रींच्या चरणकमलावर महापूजा व भाविकांसाठी महाप्रसाद तसेच येथील ब्रह्मवृंदांकडून पवमान पंचसुक्तांचे पठण होईल. यानंतर श्री नारायणस्वामी महाराजांच्या मंदिरातील श्रींची उत्सवमूर्ती सवाद्य मुख्य मंदिरात आणण्यात येईल. त्यानंतर ह. भ. प. मकरंदबुवा देवरस यांचे सुश्राव्य कीर्तन होऊन सायंकाळी पाच वाजता दत्त जन्मकाळ सोहळा संपन्न होणार आहे.

जन्माकाळानंतर पारंपरिक आरती, पाळणा होऊन सुंठवडा प्रसाद वाटण्यात येणार आहे. रात्री नऊनंतर धूप दीप आरती व पालखी सोहळा होऊन रात्री उशिरा शेजारती होणार आहे. श्रींचा पाळणा जन्मकाळानंतर उत्सवाचे मानकरी राजू ऊर्फ विष्णू पुजारी यांच्या लक्ष्मी निवास येथे भाविकांना दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.


श्री दत्तजयंती उत्सवकाळात दर्शनरांग व्यवस्था, मुखदर्शन, क्लोज सर्किट टीव्ही व्यवस्था, ध्वनिक्षेपक यंत्रणा, महाप्रसाद, कापडी मंडप, शामियाना, आकर्षक विद्युत रोषणाई, आदी आवश्यक सोयी-सुविधा दत्त देवसंस्थानमार्फत करण्यात आली आहे.

जादा एस. टी. बसेस सोडण्यासाठी राज्य परिवहन मंडळ व गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचे देवस्थानचे अध्यक्ष विकास पुजारी व सचिव प्राचार्य गुंडो पुजारी यांनी दिली. यावेळी विश्वस्त अशोक पुजारी, रामकृष्ण पुजारी, गोपाळ पुजारी, अमोल विभूते, महेश हावळे, मेघ:शाम पुजारी, आशिष पुजारी उपस्थित होते.

 

Web Title: Kolhapur: Birthday ceremony of Dattatreya in Shree Sector Nrusinhwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.