‘आयएसओ’ची ३९ पशुवैद्यकीय दवाखान्यांवर मोहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 12:52 AM2017-10-31T00:52:10+5:302017-10-31T00:56:05+5:30

कोल्हापूर : एकीकडे जनावरांवर उपचार करणाºया डॉक्टरांची संख्या कमी असतानाही जिल्हा परिषदेच्या ३९ पशुवैद्यकीय दवाखान्यांनी ‘आयएसओ ९००१-२०१५’ प्रमाणपत्र मिळवून दर्जात्मक सेवेची ग्वाही दिली

The ISO 939 Veterinary Clinic In Stamps | ‘आयएसओ’ची ३९ पशुवैद्यकीय दवाखान्यांवर मोहर

‘आयएसओ’ची ३९ पशुवैद्यकीय दवाखान्यांवर मोहर

Next
ठळक मुद्देकौतुकास्पद कामगिरी : लोकसहभागातून १५ लाखांची कामे; कमी मनुष्यबळातदेखील दखलपात्र काम५१ डॉक्टर कमी असून, अशा परिस्थितीतही ही कामगिरी करण्यात आलीजिल्ह्णात एकूण १३७ जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन दवाखाने असताना त्यासाठी १३७ डॉक्टरांची गरज

समीर देशपांडे ।  कोल्हापूर : एकीकडे जनावरांवर उपचार करणाºया डॉक्टरांची संख्या कमी असतानाही जिल्हा परिषदेच्या ३९ पशुवैद्यकीय दवाखान्यांनी ‘आयएसओ ९००१-२०१५’ प्रमाणपत्र मिळवून दर्जात्मक सेवेची ग्वाही दिली आहे. लवकरच एका शानदार समारंभात या दवाखान्यांना मानपत्र आणि प्रमाणपत्र वितरित करण्यात येणार आहे.

शासनाच्या विविध विभागांच्या सेवांबाबत नकारात्मक चर्चा करण्याचे प्रकार वाढत असताना कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने ही कामगिरी करून दाखविली आहे. या आधीही जिल्ह्णातील जनावरांच्या दवाखान्यांनी लोकसहभागातून मोठी कामगिरी करून दाखविली होती. याचाच पुढचा टप्पा म्हणून या यशाकडे पाहिले जाते. मे २०१७ पासून या प्रमाणपत्र मिळवण्यासाठीच्या प्रत्यक्ष प्रक्रियेस सुरुवात झाली. त्यासाठी प्रेसिको इंटरनॅशनल सार्टिफिकेशन प्रा. लि. या कंपनीकडे दीड लाख रुपये भरण्यात आले.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक, उपाध्यक्ष आणि कृषी समितीचे सभापती सर्जेराव पाटील-कळेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. एस. एच. शिंदे आणि त्यांच्या सहकाºयांनी या उपक्रमासाठी परिश्रम घेतले. गावपातळीवर यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली होती. त्यांनीही ग्रामस्थांना सोबत घेऊन या यशामध्ये मोठी भूमिका बजावली आहे. जिल्ह्णात एकूण १३७ जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन दवाखाने असताना त्यासाठी १३७ डॉक्टरांची गरज आहे. मात्र, ५१ डॉक्टर कमी असून, अशा परिस्थितीतही ही कामगिरी करण्यात आली आहे.

बहुमान मिळवलेले दवाखाने
आजरा, उत्तूर, भादवण, मलकापूर, मांजरे, परळे निनाई, म्हाकवे, सिद्धनेर्लीं, मुरगूड, कासारी, कळे, चुये, दिंडनेर्ली, प्रयाग चिखली, भुयेवाडी, खुपिरे, सांगवडे, इस्पूर्ली, सडोली, वडणगे, हातकणंगले, पेठवडगाव, तळसंदे, पुलाची शिरोली, रुकडी, हुपरी, शिरोळ, कुरुंदवाड, भुदरगड, गगनबावडा, कसबा वाळवे, कसबा तारळे, राशिवडे, चंदगड, हलकर्णी, हरळी बु., हसूरचंपू, कौलगे, कडगाव.


या सुविधाचा लाभ
जनावरांसाठी शावर बाथ, नव्या चाºयाची निर्मिती, अझोला वनस्पती उत्पादन प्रात्यक्षिक, रंगरंगोटी, किरकोळ दुरुस्ती, गांडूळ खत प्रकल्प, ट्रेमध्ये गवत उत्पादन, जनावरांसंबंधी तक्ते, मॉडेल्स, अग्निशमन यंत्रणा, ओला आणि सुक्या कचºयाचे वर्गीकरण, तक्रार पेटी, वाचनकट्टा, औषधांची मांडणी, छायाचित्र गॅलरी.

जिल्ह्यातील आदर्शवत बनलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्यांपैकी एका दवाखान्याचे हे प्रातिनिधिक छायाचित्र.

 

Web Title: The ISO 939 Veterinary Clinic In Stamps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.