जिल्हा स्केटिंग संघटनेच्या कारभाराची चौकशी करा-- पॅरेंट्स असोसिएशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 01:12 AM2017-10-05T01:12:04+5:302017-10-05T01:12:30+5:30

कोल्हापूर : अमॅच्युअर कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रोलर स्केटिंग असोसिएशन ही स्केटिंगची जिल्हा संघटना म्हणून कार्यरत आहे.

 Investigate the activities of District Skating Association - Parents Association | जिल्हा स्केटिंग संघटनेच्या कारभाराची चौकशी करा-- पॅरेंट्स असोसिएशन

जिल्हा स्केटिंग संघटनेच्या कारभाराची चौकशी करा-- पॅरेंट्स असोसिएशन

googlenewsNext
ठळक मुद्दे: जिल्हा प्रशासनाकडे मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : अमॅच्युअर कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रोलर स्केटिंग असोसिएशन ही स्केटिंगची जिल्हा संघटना म्हणून कार्यरत आहे. मात्र या संघटनेच्या मनमानी कारभारामुळे खेळाडूंचे मोठे नुकसान होत आहे. संघटनेच्या भोंगळ कारभाराचा फटका खेळाडूंना बसत असल्याने, या संघटनेची सखोल चौकशी करून तिची मान्यता रद्द करण्यात यावी, अशी मागणी कोल्हापूर डिस्ट्रिक्ट स्पोर्टस पॅरेंट्स असोसिएशनतर्फे जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली.

दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढून आपल्या मागण्यांचे निवेदन असोसिएशनतर्फे निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना दिले. शिंदे यांनी योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन आंदोलनकर्त्यांना दिले.
यावेळी बोलताना असोसिएशनचे अध्यक्ष स्वप्निल पार्टे म्हणाले, अमॅच्युअर कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रोलर स्केटिंग असोसिएशनचे सचिव महेश जाधव या एकाच व्यक्तीच्या हातात संघटना केंद्रित आहे. जाधव यांनी अनेक खेळाडूंना चार ते पाच वर्षांपासूनची प्रमाणपत्रे दिलेली नाहीत. शालेय स्पर्धा व फेडरेशन स्पर्धा निकालामध्ये पूर्वग्रहदूषित हेतुपुरस्पर फेरफार करून चांगल्या खेळाडूंचे खच्चीकरण करतात. त्यामुळे सर्व कारभार सुधारण्याची गरज आहे.

निवासी उपजिल्हाधिकारी शिंदे यांनी, शासकीय स्पर्धा सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा क्रीडाधिकारी यांना सूचना देण्यात येतील, असे आश्वासन आंदोलनकर्त्यांना देण्यात आले. मोर्चामध्ये प्रशिक्षक सुहास कारेकर, सचिन इंगवले, जयराम जाधव, उत्तमसिंग रजपूत, सचिन नाईक, सुनील खोत, साफिया मुल्ला, सूरज शिंदे, अरुण पोवार, शैलेश डिचोलकर यांच्यासह पालक, प्रशिक्षक व खेळाडू उपस्थित होते.

जिल्हा क्रीडाधिकारी लक्ष देत नाहीत
जिल्हा क्रीडाधिकारी माणिक वाघमारे यांच्याकडे वारंवार याबाबत तक्रार करूनसुद्धा ते दखल घेत नाहीत. स्केटिंग स्पर्धांतील वादामुळे जिल्हा क्रीडाधिकारी यांनी शालेय क्रीडा स्पर्धेवेळी उपस्थित राहणे गरजेचे असताना ते हजर राहत नाहीत. त्यांच्याकडे तक्रार करूनसुद्धा त्यांनी कारवाई केली नसल्याने नाइलाजास्तव आम्हाला तुमच्याकडे यावे लागले, असे पालकांनी सांगितले.

कोल्हापूर डिस्ट्रिक्ट स्पोर्टस् पॅरेंट्स असोसिएशनतर्फे बुधवारी जिल्हा स्केटिंग संघटनेच्या मनमानी कारभाराविरोधात दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला.

Web Title:  Investigate the activities of District Skating Association - Parents Association

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.