वाढत्या उन्हाने खरीप पिकांनी माना टाकल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 12:44 AM2018-09-19T00:44:59+5:302018-09-19T00:45:05+5:30

Increasingly, they were treated by Kharif crops | वाढत्या उन्हाने खरीप पिकांनी माना टाकल्या

वाढत्या उन्हाने खरीप पिकांनी माना टाकल्या

Next

राजाराम लोंढे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : गेले दहा-बारा दिवस पावसाने दडी मारल्याने कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील अकरा लाख हेक्टरवरील खरीप पिके अडचणीत आली असून, पिकांना माना टाकण्यास सुरुवात केली आहे. डोंगरमाथ्यावरील पिके करपू लागल्याने बळिराजा हवालदिल झाला आहे. तीन महिने सतत पाऊस झाल्याने जमिनीला वाफसा मिळाला नाही आणि आता पावसाने ओढ धरल्याने जमीन तडकू लागली आहे.
खरीप पेरणीला पोषक असाच पाऊस राहिल्याने कोल्हापूर विभागातील पेरण्यांना गती आली. सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत खरिपात प्रामुख्याने भात, सोयाबीन, भुईमूग, बाजरी ही पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. वेळेत झालेल्या पावसामुळे पिकांची उगवण जोमात झाली; पण आॅगस्टअखेर तीन महिने एकसारखा पाऊस राहिल्याने जमिनीला वाफसा मिळाला नाही. पिकांची वाढ खुंटली आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला; पण पावसाने एकदमच दडी मारली. गेले दहा-बारा दिवस एक थेंबही पडलेला नाही. त्यात कडक ऊन्हाने कोल्हापूर विभागातील अकरा लाख हेक्टरवरील पिकांनी माना टाकण्यास सुरुवात केली आहे. पावसावर अवलंबून असणाºया डोंगरमाथा, माळरानावरील पिके अडचणीत आली आहेत.
दुष्काळ ओला म्हणायची की सुका?
तीन महिने झालेल्या पावसाने पिके गेल्याने ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी झाली. आता उरलीसुरली पिके हातातोंडाला आली असताना पावसाने दडी मारल्याने ‘सुका’ दुष्काळ जाहीर करा, असे म्हणण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे.
सहा तालुक्यांत
५० टक्क्यांपेक्षा पाऊस कमी
कोल्हापूर विभागातील माण, फलटण, जत, तासगाव, आटपाडी, कवठेमहांकाळ या तालुक्यात सरासरीच्या ५० टक्क्यापेक्षा
पाऊस कमी झाला आहे.
सर्वांत कमी पाऊस माण तालुक्यात साडेतीन महिन्यात केवळ १५५ मिलिमीटर (४१ टक्के) पाऊस झाला आहे; तर सर्वाधिक पाऊस शाहूवाडी व कागल तालुक्यांत (१५७ टक्के) झाला आहे.
जिल्हानिहाय पेरणी हेक्टरमध्ये व पाऊस असा
जिल्हा पेरणी गाळपासाठी पाऊस
उपलब्ध उसाचे क्षेत्र मिलिमीटर
सातारा ४.०८ लाख ८२ हजार ४८४ ११५८०
सांगली ३.३७ लाख ८९ हजार ९१८ ३२२७
कोल्हापूर ३.९० लाख १ लाख ४९ हजार २८० १८१७८

Web Title: Increasingly, they were treated by Kharif crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.