लोकसभेला समरजित घाटगे यांना संधी मिळाल्यास जीवाचे रान करु - धनंजय महाडिक  

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2024 04:15 PM2024-03-13T16:15:31+5:302024-03-13T16:16:24+5:30

महाडिक यांच्या या वक्तत्व्यावर समरजित यांनी स्मितहास्य दिले

If Samarjit Ghatge gets a chance in Lok Sabha he will die says Dhananjay Mahadik | लोकसभेला समरजित घाटगे यांना संधी मिळाल्यास जीवाचे रान करु - धनंजय महाडिक  

लोकसभेला समरजित घाटगे यांना संधी मिळाल्यास जीवाचे रान करु - धनंजय महाडिक  

कोल्हापूर : कोल्हापूरलोकसभा मतदारसंघातून समरजितसिंह घाटगे यांचे नाव चर्चेत आहे. समरजित यांना ही संधी मिळाली तर आम्ही सर्वजण दिवसरात्र कष्ट करुन त्यांना निवडून आणू, अशी ग्वाही खासदार धनंजय महाडिक यांनी मंगळवारी दिली. नरेंद्र मोदी यांच्यावरील पोवाड्याच्या अनावरणप्रसंगी ते बोलत होते. 

समरजितसिंह घाटगे यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात सुरुवातीला भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव यांनी 'राजेंना लोकसभेची उमेदवारी मिळावी, त्यांनीही ही संधी मिळाली तर घ्यावी.' अशी साद घातली. तोच धागा पकडत खासदार महाडिक यांनी 'कोल्हापूर लोकसभेसाठी समरजितसिंह यांचे नाव दिवसभर चर्चेत आहे. ते भाजपचे उमेदवार झाले तर आम्ही भाग्यवान समजू. त्यांना निवडून आणण्यासाठी दिवसरात्र कष्ट करु' असे सांगत समरजित यांच्या लोकसभेच्या उमेदवारीला बळ दिले. 

कोल्हापूर जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा निवडून आणत पंतप्रधान मोदी यांना बळ देऊया असे आवाहनही महाडिक यांनी केले. दरम्यान, खासदार महाडिक यांच्या या वक्तत्व्यावर समरजित यांनी स्मितहास्य करत लोकसभा लढण्याचे संकेत दिले.

Web Title: If Samarjit Ghatge gets a chance in Lok Sabha he will die says Dhananjay Mahadik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.