गुजरी-महाद्वार रोडवर वडणगेच्या शिक्षिकेचे गंठण लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 12:13 PM2017-10-25T12:13:57+5:302017-10-25T12:45:05+5:30

दिवाळीनिमित्त महाद्वार रोडवर पतीसोबत खरेदीसाठी आलेल्या वडणगेच्या शिक्षिकेचे साडेतीन तोळ्यांचे सोन्याचे गंठण पर्समधून चोरट्याने हातोहात लंपास केले. याबाबत त्यांनी सोमवारी (दि. २३) जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

On the Gujari-Mahadvar road, the lavatory of Vadnage's teacher Lampas | गुजरी-महाद्वार रोडवर वडणगेच्या शिक्षिकेचे गंठण लंपास

गुजरी-महाद्वार रोडवर वडणगेच्या शिक्षिकेचे गंठण लंपास

googlenewsNext
ठळक मुद्देजुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद साध्या वेशातील पोलीस बंदोबस्तास ठेवणे अपेक्षित पर्समधील साडेतीन तोळ्यांचे गंठण चोरट्याने लंपास चोरट्यांनी उठविला गर्दीचा फायदा

कोल्हापूर : दिवाळीनिमित्त महाद्वार रोडवर पतीसोबत खरेदीसाठी आलेल्या वडणगेच्या शिक्षिकेचे साडेतीन तोळ्यांचे सोन्याचे गंठण पर्समधून चोरट्याने हातोहात लंपास केले.


अधिक माहिती अशी, शोभा लालासाहेब पाटील (वय ३४, रा. शिव पार्वती कॉलनी वडणगे, ता. करवीर) ह्या पाडळी येथील शाळेत शिक्षिका आहेत. त्या पतीसोबत दि. १६ आॅक्टोबरला महाद्वार रोडवर दिवाळीनिमित्त खरेदी व गंठण दुरूस्त करण्यासाठी आल्या होत्या.

दुपारी तीनच्या सुमारास गुजरी ते महाद्वार रोडवर खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होती. त्यातून हे दोघे चालत जात होते. पाटील यांनी खांद्याला पर्स अडकविलेली होती. त्यांचे लक्ष नसल्याचे पाहून पर्समधील साडेतीन तोळ्यांचे गंठण चोरट्याने लंपास केले. गुजरीतील सराफ दुकानात दुरूस्तीसाठी गेल्यानंतर गंठण गायब असल्याचे लक्षात आले.

याबाबत त्यांनी सोमवारी (दि. २३) जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. दिवाळीनिमित्त महाद्वार रोड, गुजरी, पापाची तिकटी परिसरात खरेदीसाठी नागरिकांची गर्दी झाली होती. या गर्दीचा फायदा चोरट्यांनी मोठ्या प्रमाणात उठविला. यापूर्वी दोन महिलांचे दहा तोळे सोन्याचे दागिने तर अनेकांचे मोबाईल चोरट्यांनी लंपास केले.

हा परिसर जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो; परंतु पोलिसांनी नागरिकांच्या सुरक्षेची कोणतीच काळजी घेतली नाही. गर्दी लक्षात घेऊन या परिसरात साध्या वेशातील पोलीस बंदोबस्तास ठेवणे अपेक्षित होते; परंतु त्याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यानी दुर्लक्ष केले.

 

Web Title: On the Gujari-Mahadvar road, the lavatory of Vadnage's teacher Lampas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.