काकांच्या सत्काराला ‘जनाधारा’ची झलक ! इचलकरंजीच्या आवळेंचं उंडाळकरांना निमंत्रण अन् सोलापूरकरांना ‘साकड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 01:33 AM2017-12-13T01:33:36+5:302017-12-13T01:37:00+5:30

कऱ्हाड : माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या राजकीय, सामाजिक वाटचालीचा व त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणाºया रयत संघटनेचा सुवर्ण महोत्सव

A glimpse of 'Janaadhara' of Kaka's ritual! Ichalkaranji's invitation to Unandalakaras and Solapuris to be 'Sacked | काकांच्या सत्काराला ‘जनाधारा’ची झलक ! इचलकरंजीच्या आवळेंचं उंडाळकरांना निमंत्रण अन् सोलापूरकरांना ‘साकड

काकांच्या सत्काराला ‘जनाधारा’ची झलक ! इचलकरंजीच्या आवळेंचं उंडाळकरांना निमंत्रण अन् सोलापूरकरांना ‘साकड

googlenewsNext
ठळक मुद्दे म्हणे कºहाड दक्षिणेत ‘सतपाल’ हेच आहे ‘फाकडं’समझनेवालोंको इशारा काफी होता है! असे उंडाळकर समर्थक सांगू लागले आहेत.

कऱ्हाड : माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या राजकीय, सामाजिक वाटचालीचा व त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणाºया रयत संघटनेचा सुवर्ण महोत्सव व १९४२ च्या भारत छोडो आंदोलनाचा अमृत महोत्सव असा संयुक्त जंगी कार्यक्रम रविवारी कºहाडात झाला. प्रीतिसंगमावरच्या भूमीत कार्यक्रमाचा त्रिवेणी संगम साधला आणि रखरखत्या उन्हात भर दुपारी काकांच्या सत्काराला जमलेली गर्दी त्यांच्या जनाधाराची झलक पुन्हा एकदा दाखवून गेली असंच म्हणावं लागेल.

जिल्ह्याच्या राजकारणात अनेक वर्षे स्वत:चा दबदबा ठेवणारे व आमदारकीची सप्तपदी पूर्ण केलेल्या विलासराव पाटील-उंडाळकर यांना गत विधानसभा निवडणुकीत काँगे्रसने ‘हात’ दाखविला. बंडखोरी करणाºया उंडाळकरांच्या भूमिकेला राष्ट्रवादीने घड्याळ्याला बाहेरूनच चावी देण्याचा प्रयत्न केला; पण उंडाळकरांचा ‘काटा’ यशापर्यंत पोहोचू शकला नाही. तेव्हापासून उंडाळकर समर्थक थोेडेसे नाराज झाले होते. मध्यंतरी उंडाळकरांनी राजकीय गणितं व्यवस्थित मांडत हातातून गेलेली बाजार समितीची ‘सत्ता’ पुन्हा ‘हातात’ घेतली. पंचायत समितीच्या सत्तेतही वाटा मिळविला. त्यामुळे कार्यकर्त्यांना ऊर्जा मिळत गेली. त्याचाच एक भाग म्हणून रविवारी झालेला सोहळा भव्य दिव्य झाला.

खरंतर एखाद्या माणसानं सतत सातवेळा एकाच मतदार संघातून आमदार म्हणून निवडून येणं खूप अवघड बाब आहे; पण ही बाब जनाधार असल्याशिवाय शक्यच नाही. ‘एखाद्या पराभवाने माणूस संपत नसतो अन् एखाद्या विजयाने तो सर्वश्रेष्ठ पण ठरत नसतो.’ तर तो त्याच्या कामाने श्रेष्ठ ठरत असतो. उंडाळकरांनी आपल्या राजकीय अन् सामाजिक जीवनातील पन्नास वर्षांच्या वाटचालीत जी अनेक समाजोपयोगी कामे केली. त्यामुळेच लोकांनी त्यांना भरभरून प्रेम दिलं अन् देत आहेत.

या कार्यक्रमात काकांनी नव्या पर्वाचं ‘रणशिंग’ फुंकलं म्हणा किंवा ‘साखर’ पेरणी केली म्हणा; पण राजकारणात थांबून चालत नाही हे काकांना पक्के ठाऊक आहे. म्हणूनच कार्यकर्त्यांचं मनोबल वाढविण्यासाठी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात काकांनी, मी अजून थकलेलो नाही. असे सांगतानाच सध्याचा काळ हा रयत संघटनेच्या दृष्टीने संक्रमणाचा काळ आहे. त्यामुळे कुठल्याही आमिषांना बळी पडू नका, जरा धीर धरा, सगळं काही व्यवस्थित होईल, असे सांगितले. काकांचं हे बोलणं भविष्यात काही राजकीय घडामोडी घडू शकतात, हेच सुचित करतयं, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.

कार्यक्रमा दरम्यान, इचलकरंजीच्या माजी मंत्री आवळेंनी उंडाळकर काकांना तुम्ही दक्षिण मतदार संघाचे ‘सतपाल’ आहात. तुम्हाला या मैदानात जोडच नाही. तुम्ही काँगे्रसमध्ये या, असे खुलं निमंत्रण दिलं. त्यामुळे व्यासपीठावरील मान्यवरांसह समोरच्या गर्दीतही हास्याचे फवारे सुरू झाले. कार्यकर्त्यांनी घोषणा देताच आवळेंनी माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना उद्देशून काकांवरील झालेला राजकीय अन्याय दूर करा. त्यांना आत्ताच हार घालून काँगे्रसमध्ये प्रवेश दिल्याचं जाहीर करा, असं साकडं घातलं.

प्रत्यक्षात काकांना मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. गांधीवादी विचारसरणीची साक्ष म्हणून चरख्याची प्रतिकृती भेट दिली. यावेळी शिंदे यांनी सुताचा हार काकांच्या गळ्यातही घातला. त्यानंतर सुशीलकुमार शिंदे नेमकं काय बोलणार? याची साºयांनाच उत्सुकता होती; पण सोलापूरच्या शिंदेंनी काका हे संकटांना न घाबरणारे व्यक्तिमत्त्व आहे. त्यांना स्वातंत्र्य सैनिकांच्या घराण्याचा वारसा आहे. असं सांगत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. पण ‘त’ म्हटलं की आम्ही ताक ओळखतो, समझनेवालोंको इशारा काफी होता है! असे उंडाळकर समर्थक सांगू लागले आहेत.

प्रसंग बाका... उपाय विलासकाका
कºहाड दक्षिणमधील उद्याची विधानसभेची निवडणूक अटीतटीची, दुरंगी-तिरंगी होईल, अशी शक्यता कार्यकर्ते बोलून दाखवित आहेत. अशावेळी उंडाळकर गटाच्या वतीने पुन्हा एकदा प्रसंग असला बाका तर उपाय म्हणून उमेदवार विलासकाकाच असतील, अशी चर्चा या कार्यक्रमानंतर उंडाळकर समर्थकांच्यात सुरू झाली आहे.

उदय पाटील यांचे यशस्वी नियोजन
अ‍ॅड. उदय पाटील हे उंडाळकर काकांचे राजकीय वारसदार आहेत. अलीकडच्या काळात ते राजकारणात बरेच सक्रिय झाल्याचे दिसतात. पण रविवारच्या सुवर्ण अन् अमृत महोत्सवानिमित्त आयोजित या कार्यक्रमावर उदय पाटील नियोजनाचीच छाप होती. त्यांच्या युवा संघटनेची फौज कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सक्रिय दिसत होती.

Web Title: A glimpse of 'Janaadhara' of Kaka's ritual! Ichalkaranji's invitation to Unandalakaras and Solapuris to be 'Sacked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.