बावड्याच्या ‘खिंडी’त जिवाशी खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 12:28 AM2017-11-06T00:28:07+5:302017-11-06T00:32:37+5:30

The game in Bawadda's pass | बावड्याच्या ‘खिंडी’त जिवाशी खेळ

बावड्याच्या ‘खिंडी’त जिवाशी खेळ

Next

रमेश पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कसबा बावडा : कोल्हापूर शहरातून पुणे-मुंबई हायवेला जोडणारा शॉर्टकट रस्ता म्हणून कसबा बावडा-शिये या रस्त्याची ओळख आहे. मात्र, पंचगंगा नदीपासून शंभर फुटी असलेला हा रस्ता कसबा बावड्यात प्रवेश करताना ६० फुटीच आहे. त्यात अतिक्रमण, अस्ताव्यस्त पार्किंग यामुळे अवघा ४० फुटीच रस्ता वापरात येतो. यामुळे या मार्गांवर वाहतुकीची नेहमीच कोंडी होत आहे. जीव मुठीत धरून कासवगतीने येथे वाहने चालवावी लागतात.
कसबा बावडा-कोल्हापूर रोडवर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. त्यामध्ये औद्योगिक वसाहतीतील नोकरदारांची दुचाकी वाहने, डंपर, केएमटी बसेस, राष्टÑीय महामार्गावरून येणारी प्रवासी वाहने तसेच गळीत हंगामावेळी उसाच्या बैलगाड्या व ट्रक-ट्रॅक्टर, आदी वाहनांचा समावेश असतो. याशिवाय या मार्गावरच पोलीस मुख्यालय, मुख्य पोस्ट आॅफिस, जिल्हाधिकारी कार्यालय, न्यायसंकुल, शैक्षणिक संकुल, वनविभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, विक्रीकर भवन, जिल्हा प्रशासकीय कार्यालय, अनेक शाळा, महाविद्यालये, आदी असल्याने जाण्या-येण्यासाठी त्याचा प्रामुख्याने वापर होतो. सकाळी १० ते ११ व सायंकाळी ५ ते ७ या वेळेत तर प्रचंड गर्दी होते. यावेळेत लहान-मोठे अपघात झाले आहेत.
रस्त्यावरील वाढती रहदारी कमी व्हावी तसेच अवजड वाहने येऊ नयेत म्हणून खानविलकर पेट्रोलपंप ते कसबा बावड्यातील श्रीराम पेट्रोल पंप असा पाच कि.मी.चा पंचगंगा नदीकाठावरून शंभरफुटी रस्ता मंजूर झाला. त्यानंतर काही दिवसांत त्याचे कामही सुरू झाले. नंतर मात्र ते बंद पडले. मनपाने हे काम संबंधितांकडून वेळेत पूर्ण करून घेतले तर बावडा मार्गावरील बरीच वाहतूक कमी होईल. बावडा-कोल्हापूर या मार्गावर जशी बावड्यात विविध कारणांनी वाहतुकीची कोंडी होते तशीच कोंडी या मार्गावरील सीपीआर चौक ते शिवाजी पुतळा या प्रचंड वर्दळीच्या मार्गावरही होते. काही वाहनधारक गाडीवर बसूनच रस्त्यावरील भाजी व फळे खरेदी करतात. विक्रेतेही टोपली रस्त्यावर मांडतात. मराठा बॅँक कॉर्नर, शिवाजी रोड, पापाची तिकटी व भवानी मंडपातून येणाºया प्रचंड वाहनांमुळे दिवसभर हा रस्ता गर्दीत हरवलेला असतो. कसबा बावड्यात विविध सणांवेळी मुख्य रस्त्यावर पाण्याचा हौद चौकात फळ व फुले विक्रेते, पूजेचे साहित्य विक्रेते बाजार भरवितात. त्यामुळे या ठिकाणी सणाच्या पूर्वसंध्येला खूपच गर्दी होते. वाहतुकीची प्रचंड कोंडी होते. हा बाजार भाजी मार्केटमध्ये भरविणे गरजेचे आहे.
बावडा मेनरोडवर रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांचे पार्किंग
शंभर फुटी रस्त्यावरून सुसाट येणारी वाहने नियंत्रित न होणे
बावड्यातील प्रत्येक गल्लीच्या तोंडाला स्पीड ब्रेकर नसणे
बावड्यातील मुख्य रस्त्यावर पुढे स्पीड ब्रेकर आहे असे फलक नसणे
सीपीआर चौक ते शिवाजी पुतळा रस्त्यावर दोन्ही बाजूला प्रचंड पार्किंग केलेली वाहने
भाजी विक्रेते व फेरीवाल्यांच्या गाड्यांचा अडथळा


गळीत हंगामात बावडा मेनरोडवर पाण्याचा हौद चौकात सायं. ५ ते ८ या वेळेत वाहतूक पोलीस नेमणे .
बावडा रिंगरोडचे काम त्वरित करणे
शिये टोलनाका रोडवरील विद्युत दिवे रात्रीच्यावेळी लावणे



 

Web Title: The game in Bawadda's pass

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.