व्यापार्‍याला लुटणारे चार पोलीस निलंबित

By admin | Published: June 1, 2014 02:46 AM2014-06-01T02:46:09+5:302014-06-01T02:46:46+5:30

पोलीस कोठडीत रवानगी

Four policemen lynching businessman suspended | व्यापार्‍याला लुटणारे चार पोलीस निलंबित

व्यापार्‍याला लुटणारे चार पोलीस निलंबित

Next

कोल्हापूर : गडहिंग्लजमधील कापड व भांडी व्यापार्‍यास ‘मोक्का’अंतर्गत कारवाईची भीती दाखवून तीन लाख ८५ हजार रुपये लुटण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलीस मुख्यालयातील चार पोलिसांना आज, शनिवारी प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी निलंबित केले. दीपक चंद्रकांत पाटील, अमर सुभाष उबाळे, सुशीलकुमार मोहनराव गायकवाड, प्रवीण ईश्वरा मोहिते अशी या निलंबित पोलीस कर्मचार्‍यांची नावे आहेत. हे निलंबित पोलीस २०१० मध्ये पोलीस दलात रुजू झाले होते. दरम्यान, गेल्या पाच महिन्यांत पोलीस दलातून आतापर्यंत सहा पोलिसांना निलंबित केले गेले आहे. याबाबत अंकित गोयल म्हणाले, निलंबित केलेले हे सर्व पोलीस साध्या वेशात होते. तसेच यांतील काहीजण कर्तव्य बजावत होते, असे प्राथमिक तपासात निष्पन्न होत आहे. या पोलिसांचा हेतू काय होता? त्यांनी कशासाठी हे केले? या दृष्टीनेही पोलीस तपास करीत आहेत. या चौघांची पोलीस दलात फक्त तीन वर्षे सेवा झाली आहे. हा गंभीर गुन्हा असल्याने न्यायालयाने त्यांना १२ दिवस पोलीस कोठडी सुनावली. काल, शुक्रवारी गडहिंग्लजमधील कापड व भांडी व्यापारी हबीब रावतार यांच्या भाड्याच्या घरी वरील चौघे पोलीस कारमधून गेले. त्यावेळी रावतार यांची मुले सद्दाम व नसरुद्दीन ही घरी होती. आपण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस असल्याचे सांगून ‘तुमचे सर्व धंदे माहीत आहेत. तुमच्यावर ‘मोक्का’अंतर्गत कारवाई करतो’, अशी भीती दाखवून मुलांना मारहाण केली. यावेळी घरात असलेल्या वाहिद रावतार यांच्याकडून चाव्या घेऊन तिजोरीमधील ३ लाख ८५ रुपये काढून घेऊन त्यांना कोल्हापुरात चारचाकीमधून आणून सोडून दिले. दरम्यान, हबीब यांना सद्दाम याचा फोन आला. त्यांनी या प्रकाराची माहिती गडहिंग्लज पोलीस ठाण्याचे निरीक्षक रामदास इंगवले यांना दिली. १२ जूनपर्यंत कोठडी गडहिंग्लज : गडहिंग्लज येथील भांडी व्यापारी व त्याच्या व्यवस्थापकाचे अपहरण करून त्यांना लुटण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी कोल्हापूर पोलीस मुख्यालयातील पोलीस दीपक चंद्रकांत पाटील (३१, रा. कदमवाडी, विचारे माळ, कोल्हापूर), अमर सुभाष उबाळे (वय २६, रा. स्वामी गल्ली, जाधववाडी कोल्हापूर), सुशीलकुमार मोहनराव गायकवाड (वय २८, रा. आरळे, ता. पन्हाळा) व प्रवीण ईश्वरा मोहिते (वय २६, रा. मांजर्डे, ता. तासगाव, जि. सांगली) यांना आजरा येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. बी. तहसीलदार यांनी गुरूवार (१२) जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. (प्रतिनिधी)

Web Title: Four policemen lynching businessman suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.